Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आदिवासी आश्रम शाळा वर्षी कृतीशिल शिक्षक श्री यशवंत निकवाडे सर यांना ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार प्रधान....



शिरपूर प्रतिनिधी:- माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा वर्षी तालुका शिंदखेडा येथील कृतीशिल शिक्षक श्री यशवंत निकवाडे सर यांची ज्ञानदीप प्रतिष्ठान, कुरखडी ता.शिरपूर च्या वतीने ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार मा.जि.प.अध्यक्ष श्री तुषारभाऊ रंधे,जेष्ठ साहित्यिक श्री.बापूसाहेब एम.के.भामरे,झी मिडीया चे प्रतिनिधी श्री.प्रशांत परदेशी, लोकमत एटीन चे प्रतिनिधी या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार स्वर्गीय दिपक मोरे,स्वर्गीय गिरीश मोरे व स्वर्गीय हिरामण कुंभार या शिक्षकांच्या स्मृती पित्यर्थ ज्ञानदीप प्रतिष्ठान ने आयोजित केला होता.श्री.यशवंत निकवाडे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून, त्यांनी साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक श्रेत्रात,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाआहे.सरांचे आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाले असून त्यांचे 'जगण्याची संजीवनी 'हे पुस्तक चांगलेच चर्चेत आहे.

त्यांचे कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्याने अनेक ठिकाणी झालेले आहेत.समाज सेवेत पण सरांचे काम कौतुकास्पद आहे.थंडीचा काळात निराधार व गरजू व्यक्तींना ब्लँकेट,
पाणी,अन्नधान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे.अनेक मोठ मोठ्या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन पण करत असून त्यांची ह्या पुरस्कारासाठी सार्थ निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.कार्रक्रम यशस्वीते साठी श्री.योगेश्वर मोरे,
श्री.मनोहर वाघ.श्री.दिलीप मोरे व सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ठाकरे सर यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध