Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

राज्य उत्पादन शुल्क शिरपूर यांची धडक कारवाई....! आमोदे शिवार संगीता लॉन्स च्या बाजूला अवैध रित्या स्पिरिटचा साठा जप्त....!



शिरपूर प्रतिनिधी:-दिनांक 21/09/2023 मा.डॉ. विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री. सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. डॉ.बी.एच.तडवी विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, मा. श्री. मनोज शेवरे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर ता. शिरपूर जि.धुळे श्री.ए. सी. मानकर यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, दिनांक २१/०९/२०२३ रोजी आमोदे शिवार संगीता लॉन्स च्या बाजूला पत्राच्या शेड मध्ये आमोदे ता. शिरपूर जि. धुळे येथे अज्ञात इसमाने अवैध रित्या स्पिरिटचा साठा विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला आहे.

त्यानुसार दोन पंचास कार्यालयात बोलवून सदर बातमी सविस्तर समजावून सांगितले वरून पंचा समवेत शासकीय वाहनाने मिळालेल्या बातमी नुसार आमोदे शिवार संगीता लॉज जवळ गेलो असता लॉजला लागून एक पत्राचे शेड दिसून आले आम्ही सर्व जन पत्राच्या शेड मध्ये प्रवेश केला असता त्याठिकाणी दोन 250 लिटर व नऊ 35 लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम दिसून आले त्या ड्रम जवळ एक इसम संशयास्पद उभा असलेला दिसून आला सदर इसमास आमचा सर्वांचा परिचय देवून येण्याचा उद्देश सांगून त्याचे समवेत सदरील ड्रमचे झाकणे उघडून पहिले असता त्यात पातळ द्रव्य भरलेले दिसून आले सदरील 250 लिटर व 35 लिटर ड्रम मधील पातळ द्रवानाचा वास घेतला असता तो स्पिरीट सदृश्य असा आल्याने आमची सर्वांची खात्री झाली की, सदर ड्रम मध्ये स्पिरीट आहे. त्यानंतर सदर इसमास त्याचे नाव गाव व मुद्देमाला बाबत विचारले असता त्याने त्याचे नाव महेंद्र बाबूसिंग गिरासे वय ४५ वर्ष रा. आमोदे ता. शिरपूर जि.धुळे असे सांगून हा सर्व मुद्देमाल त्याचाच असून तो खुल्या बाजारात अवैध रित्या विक्री करतो असे मान्य केले त्यानंतर त्याचे ताबे कब्जातून एकूण अंदाजे रु. ५३.६००/- किंमतीचा स्पिरीटसाठा दारूबंदी गुन्ह्याखाली गु.र.क्र.११२ /२०२३ दिनांक २१/०९/२०२३ नुसार जप्त करून त्यास अटक करण्यात आले.

सदरची कारवाई श्री. डी. पी.नेहूल निरीक्षक, शिरपूर श्री. ए. पी. मते निरीक्षक सि.त.ना हाडाखेड श्री. ए. सी. मानकर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. शिरपूर, स. दु.नि.ए.बी. निकुंबे जवान श्री. केतन जाधव श्री. शांतीलाल देवरे श्री.मनोज धुळेकर, तसेच वाहन चालक श्री.रवींद्र देसले यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून पुढ तपास श्री.ए.सी.मानकर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. शिरपूर ता, शिरपूर, जि. धुळे, हे करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध