Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

शिरपूर तालुका पोलिसांना यश...! प्रतिबंधित सुगंधी तंबाखू सह मुद्देमाल हस्तगत गुन्हा दाखल...!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून कारवाई केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू व पान मसाल्याची मोठी तस्करी रोखण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आले असून या कारवाईत 81 लाख 77 हजार 190 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

दि.28/10/2023 रोजी सहायक पोलीस निरिक्षक श्री जयेश खलाणे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली को, सेंधवा कडुन एक ट्रक क्र. KA 10 A 6956 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुंगधीत तंबाखु व पानमसाला भरुन धुळे कडे येत आहे अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन सपोनि जयेश खलाणे यांनी पथक तयार करून सापडा रचनाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत सदर वाहन हे हाडाखेड चेकपोस्ट जवळ मुंबई आग्रा रोडवर रात्री (02.30 वाजेच्या सुमारास पकडुन त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुरेश एन बेलुधिरा वय- 31 वर्ष, व्यवसाय चालक व क्लिनर, रा. नॅथरापुझा, पुलक्कलकडयु, पुल्लसेरी, करकुरीस्सी, गुल्लीसेरी, पल्लकड, केरल असे सांगून त्यास वाहनात काय आहे बाबत विचारले असता त्याने वाहनात मैदा व रवा असल्याचे सांगितले. परंतु सदर वाहनात सुगंधीत तंबाखु व पानमसाला असल्याचा संशय आल्याने सदर वाहनाची ताडपत्री उघडुन बघितले असता मैदा व रवाच्या गोण्यांखाली सुगंधीत तंबाखू व पानमसाला आढळुन आला. परंतु रात्री अपरात्र झाल्याने व मजुर उपलब्ध नसल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात सदरचे वाहन लावुन दि.28/10/2023 रोजी 16.00 वाजता दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन त्यात खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत सुपारी मिळुन आली.

) 51,77,190/- रुपये किंमतीचा शिखर पानमसाला, गणेश सुगंधीत तंबाखू, व कुल लिप नावाची सुगंधीत तंबाखु

2) 30,00,000/- रुपये किंमतीची एक भारतबेंझ कंपनीची 3523 मॉडेल असलेली 12 चाकी ट्राला असलेला निळसर रंगाचा ट्रक तिचा आर.टी.ओ. पासिंग क्र. KA 10 A 6956 असा असलेली असा एकुण- 81,77,190/- एवयांऐंशी लाख सत्त्यात्तर हजार एकशे नव्वद रुपये किंमतीचा माल वाहनासह विक्रीसाठी वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदर मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक  संजय बारकुंड ,अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरिक्षक श्री जयेश खलाने, पोलीस उप निरिक्षक श्री विजय पाटील, पोकॉ संजय भोई, पोकों दिनकर पवार, पोकॉ सुनिल पवार, पोकों योगेश मोरे, पोकों संतोष पाटील, चालक पोहेका अलताफ मिझां यांनी केलेली असुन सदर कारवाई बाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्री किशोर हिंमतराव बाविस्कर यांनी फिर्याद दिल्यावरुन नमूद चालकाविरुध्द शिरपुर तालुका पोलीस ठाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई विजय पाटील, पोकों संजय भोई हे करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध