Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात धुळे तालुक्यातील आतापर्यंत तिघांचा ओढवला मृत्यू ; बिबट्याच्या बंदाबस्ताची मागणी...!
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात धुळे तालुक्यातील आतापर्यंत तिघांचा ओढवला मृत्यू ; बिबट्याच्या बंदाबस्ताची मागणी...!
धुळे प्रतिनिधी :- नरभक्षक बिबट्याचा धुळे तालुक्यात हैदोस सुरू असतानाच हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. रमेश नरसिंह दुडवे (वय 9, पावरा) असे मयत बालकाचे नाव आहे. या बालकासह आतापर्यंत तिघांचा बिबट्याने बळी घेतल्याने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
झुंज ठरली अपयशी
धुळे तालुक्यातील बोरी परीसरातील मोघण येथील धाडरे रस्त्यावरील शेतातील घरात रमेश नरसिंह दुडवे (9, पावरा) हा कुटूंबासोबत झोपलेला असतांना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. बालकाने आरडाओरड केल्यानंतर नागरीकांनी धाव घेत बिबट्याला पळवले. मात्र हल्ल्यात बालक जखमी झाल्यानंतर त्यास धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मानेवर बिबट्याने पंजा मारल्याने रमेशची प्रकृती गंभीर असतानाच या बालकाचा देखील रविवारी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेल्याने परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अथवा त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा