Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
मा.आमदार फारूख शाह यांच्याविरुद्ध वाढीव कलमे; वादग्रस्त टिपू सुलतान नामक स्मारकाचे प्रकरण....!
मा.आमदार फारूख शाह यांच्याविरुद्ध वाढीव कलमे; वादग्रस्त टिपू सुलतान नामक स्मारकाचे प्रकरण....!
धुळे प्रतिनिधी:- धुळे शहरातील जुना वडजाई रोड व शंभरफुटी रोड चौकात आमदार फारुक शाह यांनी शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे टिपू सुलतान नामक स्मारक, चौथरा उभारला होता. त्यासंदर्भात भाजपने स्थानिक प्रशासन व शासनाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत यंत्रणेने ८ जूनला मध्यरात्रीनंतर तो चौथरा निष्काषित केला होता.यासंदर्भात दाखल गुन्ह्यात आमदार शाह यांच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२७) रात्री वाढीव कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी आमदार शाह यांच्याविरुद्ध कलम १२० ब म्हणजे कटकारस्थान करणे, कलम ४०९ म्हणजे सरकारी पैशांचा अपहार, लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक कायदा कलम ७ म्हणजे पैशांची मागणी करणे व स्वीकारणे, अशी कलमे लावली जावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने तीन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती.
त्यानुसार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार दाखल गुन्ह्यात आमदार शाह यांच्याविरुद्ध ही वाढीव कलमे लावली आहेत. या प्रकरणी यापूर्वी पोलिस ठाण्यात विविध कलमांसह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. वडजाई रोड व शंभरफुटी रोड चौकात आमदारांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे टिपू सुलतान नामक चौथरा उभारला. त्याविरुद्ध शासनाकडे तक्रार झाल्यावर प्रशासनाने चौथरा हटविला.यानंतर तक्रारदारास ६ ते १५ जूनदरम्यान ८ ते ९ अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम अकांउटवरून तक्रारदाराच्या मोबाईलवर ठार करण्याची धमकी दिली.
काही महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. काही विशिष्ट कारणावरून शत्रुत्व वाढविण्याचे आणि भावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न केल्याने अनोळखी ८ ते ९ व्यक्ती व आमदार शाह यांच्याविरुद्ध नमूद गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्ह्यात आमदार शाह यांनी अनधिकृतपणे, विनापरवानगी, शासकीय निधीचा गैरवापर करून वादग्रस्त चौथऱ्याचे बांधकाम करून तेढ निर्माण केली. त्यांचे कृत्य द्रोहासारख्या गुन्ह्याचे आहे.
आमदार शाह यांनी पूर्वनियोजितपणे कटकारस्थानातून पदाचा व अधिकारांचा गैरवापर करून अनधिकृतरीत्या चौथऱ्याचे बांधकाम केल्याचा, शासकीय निधीचा वापर करून त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला. त्यानुसार संबंधित वाढीव कलमे लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा