Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

शिरपूर तालुक्यात अजून एक नवीन बचत गट घोटाळा उघडकीस येण्याच्या मार्गावर...! शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार देखील समोर येण्याची दाट शक्यता....!



धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एका नामांकित बँकेतील गैरव्यवहार व अपहराचे घोटाळे थांबता थांबेनात.

काही दिवसापूर्वीच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एका नामांकित शेतकऱ्यांच्या बँकेतील शिरपूर तालुक्यातील सराईत सावकाराने केलेला बचत गट घोटाळा प्रकरण अजून शांत होत नाही, तोच अजून एक नवीन बचत घोटाळा समोर येण्याच्या मार्गावर आहे. यात माझे तर कामकाज उत्कृष्ट आहे असे भासवत वरच्यावर कशाप्रकारे आपल्याला पैसा कमावता येईल व जो पैसा अनरेकार्ड ही असेल,  आणि हे कोणाला काही कळणार नाही. असे भामटास वाटत असावे.असे असले तरी वृत्त मीडिया आपले डोळे बंद ठेवणार नाही. वृत्त मीडिया व लाईव्ह मीडिया यांचे परिसरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अतिशय बारीक नजर असते. कारण हेच तर आमचे जनसेवेचे काम आहे. हे कसे काय हे लोक विसरतात तेच समजत नाही.

यातच अजून याच शेतकऱ्यांच्या नामांकित बँकेत शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांची कशाप्रकारे फसवणूक करण्यात आली हे देखील समोर येऊ शकते याबाबत अत्यंत स्पष्टपणे मात्र तोडकी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली असून यात शेतकऱ्यांबरोबरच बँकेला देखील कसा चुना लावला हे आम्ही सविस्तरपणे उघड केल्याशिवाय शांत बसणार नाही. कारण जनसेवा हीच खरी सेवा.

( वाचा सविस्तर पुढील अंकात...)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध