Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात तालुका पोलिसांनी या आठवड्यात दुसऱ्यांदा गांजा शेतीवर कारवाई करून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात वनविभागाच्या ताब्यातील वनजमिनीवर अतिक्रमण करून त्या जागेचा वापर उपजीविकेसाठी न करता गांजा लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याच्या घटना या तालुक्यात होणाऱ्या कारवाईतून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांना बातमी मिळाल्यावर गांजा शेतीवर कारवाई होते मात्र वनविभागाचे गार्ड ,वनपाल, वनक्षेत्रपाल, इत्यादी नेहमी या वनक्षेत्रात ग्रस्त घालत असतात तरीदेखील त्यांना या गांजा शेतीच्या शोध लागत नाही याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवाय वारंवार तालुक्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल होत असून देखील या कठोर कायद्याचे तालुक्यातील आरोपींना कोणतेही गांभीर्य नाही असे देखील प्रकर्षाने दिसून येत आहे.
या महिन्यात शिरपूर तालुका पोलिसांकडून दुसऱ्यांदा गांजा शेतीवर कारवाई
दि.16/10/2023 रोजी सपोनि श्री जयेश खलाणे सो. यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, इसम नामे मदन भरतसिंग पावरा वय 48 वर्षे व्यवसाय शेती रा.टिटवापाणी पो.सुळे ता. शिरपुर जि.धुळे त्याच्या वनजमिनीत मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवून आणणारा गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड करुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाढविले आहेत. अशी बातमी मिळाल्यावरुन सपोनि श्री जयेश खलाणे यांना लागलोच मा.पोलीस अधिक्षक सो. धुळे यांची सदर ठिकाणी जावुन कार्यवाही करण्याची परवानगी घेवून तहसिल कार्यालय शिरपुर येथील राजपत्रीत अधिकारी श्री महेश यशवंत बोरसे, महसुल नायब तहसिलदार शिरपुर पंच वजनकाटा धारक, फोटोग्राफर व पोलीस स्टाफ सह टिटवापाणी पो. सुळे गावाचे शिवारात पोहचले व बातमीनुसार इसम नामे मदन भरतसिंग पावरा हा कसत असलेल्या शेताचा शोध घेतला असता एका शेतात गांज्या आमली पदार्थ वनस्पतीची लागवड केलेली दिसली. सदर ठिकाणी छापा टाकताच पोलीस आल्याची चाहुल लागताच शेती कसत असलेली इसम हा तेथुन पळुन जात असतांना त्यास पोलीस स्टाफच्या मदतीने पाठलाग करुन त्यास पकडुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर चिलारे गावाचा पोलीस पाटील व सरपंच यांना सदर घटनास्थळी बोलावुन राजपत्रित अधिकारी व पंचासमक्ष सदर शेत कोण कसत आहे बाबत विचारले असता सदर शेत मदन भरतसिंग पावरा वय 48 वर्षे व्यवसाय शेती रा. टिटवापाणी पो.सुळे ता. शिरपुर जि.धुळे हा कसत आहे असे सांगीतले. पोलीस पाटील यांस सोबत घेवून तो कसत असलेल्या शेताची पाहणी करता सदर शेतात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केलेली दिसून आली सदर क्षेत्रामध्ये सुमारे 5 ते 6 फुट पावेतो कमी अधिक उंचीचे झाडांची लागवड केलेली असून सदर झाडे हिरवेगार ताजे उभे असलेले दिसले. सदर शेतातील गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पती मुळासकट उपटून त्यांचे वजनकाटा धारक यांनी सदर झाडांची वजनमापे घेतली असता एकुन 5,77,500/- रु. कि. चे एकूण 165 किलो वजनाचा गांजा सदृश्य आमली पदार्थाचे हिरवे ओले ताजे झाड, पाने, फुले व फांदया असलेले मुळासह, मुळापासून ते शेडया पर्यंत उंची अंदाजे 5 ते 6 फुटापर्यंत कमी जास्त असलेले मुळास थोडी माती लागलेली प्रति किलो 3500/-रु दराचे अंदाजे. असा मुद्देमाल असतगत करून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड सो, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सपोनि जयेश खलाणे, पोसई संदीप पाटील, पोसई कृष्णा पाटील, पोसई सुनिल वसावे पवार, पोहेकॉ संजय माळी, पोना शेखर बागुल, पोकों प्रकाश भिल, पोकों सुनिल पवार, पोकॉ मुकेश पावरा, पोकों रोहिदास पवार, पोकों रंणजीत वळवी मपोकों सुनिता पवार, चापोहेकॉ अल्ताफ मिर्झा, चापोकों ईसरार फारुकीयांनी केलेली असून सदर गुन्ह्याबाबत पोहेकॉ सागर खंडु ठाकुर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन गु.र.नं. 0233/2023 NDPS कायदा कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास पोसई संदिप पाटीले करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा