Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३
परंडा तालुक्यात आरक्षणाचा बळी,डोमगाव येथील शेतकर्याने केली आत्महात्या !
परंडा (राहूल शिंदे)दि.२७ तालुक्यातील डोमगाव येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नसल्याने नैराश्यातून आज दुपारी १ वा. सुमारास स्वतः च्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात ही आरक्षणाचा बळी गेला आहे .
याबाबत माहिती अशी की, शेतकरी बळीराम देविदास साबळे (वय ४७ वर्ष ) शुक्रवारी सकाळी घरून शेतात जात असताना आपल्याला काही आरक्षण मिळत नाही , मेल्यालं बरं , असे सकाळी कांही ग्रामस्थ गावात बसलेले असताना ते बोलले होते . शेतात गेल्यानंतर दुपारी १ वा. सुमारास त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतला .जेवण करण्यास का येईनात म्हणून त्यांची पत्नी मिराबाई या शेतात गेल्या असता त्यांनी प्रथमतः ही घटना पाहिली . त्यांनी आरडा ओरड केली . माहिती समजताच कांही ग्रामस्थ शेतकरी घटनास्थळी पोहचले.त्यांचे चुलत भाऊ गणेश साबळे यांनी या बाबत परंडा पोलीस ठाणे व परंडा तहसिलदार यांना माहिती दिली आहे .
त्यांना दोन मुल आहेत . एक ज्ञानेश्वर हा उच्च शिक्षण घेत आहे . तर दुसरा सिद्धेश्वर हा अपंग आहे.वडील अर्धांगवायु आजार झाल्याने घरातच आहेत . शेती केवळ दीड एकर आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा