Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३
बोराडी येथे दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ... नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
बोराडी ता.शिरपूर ( वार्ताहर ) बोराडीसह परिसरात गेल्या आठवड्यापासून दुचाकी वाहने दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या दहा दिवसाच्या आत चार मोटरसायकली दिवसा चोट्यांनी लंपास केल्याची घटना बोराडी गावात घडले आहे याबाबत विशेष म्हणजे वाहनधारक चोरीची फिर्याद नोंदणी करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारावा लागत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे यामुळे वाहन चोरीला गेलेल्या मालकांनी तीव्र शब्दात दुःख व्यक्त केले आहे.
दि.१४ ऑक्टोबर रोजी योगेश मधुकर पाटील यांच्या कापड दुकानासमोर लावलेली होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल क्र.एम एच 18.ए.टी 8778 व दि. २३ ऑक्टोबर रोजी भूषण पाटील यांची होंडा शाईन कंपनीची क्र.एम.एच.18 ऐ.एम 4259 दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली आहे.व चोरटा हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे दिसत आहे.
गेल्या पंधरा दिवसांत होंडा कंपनीची तीन व एक स्कूटर असे एकूण चार दुचाकी वाहन दिवसा दिवसा चोरांनी पळविल्यामुळे बोराडी सह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गाडी चोरीची कम्प्लेंट नोंदवण्यासाठी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वाहनधारकांना पाच- सहा तास थांबून देखील दोन दोन तीन दिवस चकरा माराव्या लागतात .साहेब अजून आले नाही, साहेब अर्धा तासात येथील, साहेब बाहेर गेले आहेत. साहेब असतील तर तपास अधिकारी बाहेर आहेत, असे सांगून तीन चार दिवस निघून जातात. यामुळे काही वाहनधारक चोरीची कम्प्लेंट देखील नोंदवत नसल्याचे दिसून आले आहे. योगेश मधुकर पाटील, भुषण धुडकु पाटील, यांच्या ही दुकानासमोरील होंडा कंपनी शाईन दुचाकी चोरट्यांनी दिवसाढवळ्याला लांबवल्याची घटना घडली असून चोरांना पोलिसांचा कसलाही धाक राहिला नाही असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेत.तसेच 10 ते 12 दिवसांपूर्वी मानाचे देवदत्त मंदिरासमोरील ईश्वर भिल यांची होंडा शाईन या कंपनीची दुचाकी क्र.एम.एच.18 ऐ.टी.5320 हे व योगेश पाटील यांची क्र.एम एच 18 ए.टी.8778 तिघेही होंडा शाईन कंपनीचे वाहन सतत चोरल्या जात असल्याने दुचाकी धारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.विशेषतः शाईन दुचाकी धारक हे फार चिंतेत आहे.
योगेश मधुकर पाटील
अलीकडे पोलीस अधिकारी हे अश्या प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा बोराडी सह परिसरात सुरू आहे.व गेल्या काही काळात माझ्याकडे असलेली पल्सर या वाहनासह चार तांदळाच्या गोण्या व इंडिका गाडीतील बॅटरीसह इतर साहित्य व माझ्या धनलक्ष्मी ऍग्रो कृषी सेवा केंद्रातून साधारणतः 1.5 लाख रुपयांची चोरी झाली होती सातत्याने ह्या प्रकारच्या घटना घडत असल्याने त्रस्त झाल्याने सदर घटना उघडकीस न आल्यास किंवा वाहन चोरांचा छडा न लागल्यास पोलीस अधीक्षक धुळे यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा ईशारा योगेश मधुकर पाटील यांनी दिला आहे.
भूषण पाटील
मी दोन दिवसांपासून पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदणीकामी गेलो असता शिरपूर तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी हे टाळाटाळ करत असून त्यांनी माझी दुचाकी शोधून न दिल्यास गृहमंत्र्यांकडे पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार करणार असल्याची माहिती भूषण पाटील यांनी दिली.
ईश्वर भिल
मी एक मोलमजुरी करणारा माणूस असून माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने मला दुसरे वाहन घेणे हे शक्य होणार नाही तरी माझी दुचाकी पोलिसांनी शोधून न दिल्यास शिरपूर तालुका पोलीस स्टेशनवर मोर्चा नेणार ईश्वर भिल.
सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे
बोराडीसह परिसरात विशेष गस्ती पथकाची नियुक्ती करून चौक बंदोबस्त केला जाईल तसेच वाहनधारकांनी संयम बाळगावा लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहेत तरी पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा असे आव्हान सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी केले.
योगेश मधुकर पाटील यांची गाडी दि.१४ ऑक्टोबर 2023 रोजी चोरी गेली होती त्या चोरीचा पंचनामा करण्यासाठी बोराडी बीटचे संजय चव्हाण,मोहन पाटील हे दि.२३ ऑक्टोबर आले होते. चोरी झाल्यानंतर तब्बल दहा दिवसात पोलीस तपास करण्यास आल्याने वाहनधारकांचा साहजिकच राग अनावरण झाला होता त्यांनी दहा दिवसात आल्या बाबत आपण आले आमचे गाडी सापडली नाही म्हणून आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करू असे सांगितले त्यावर हे दोन्ही हवालदार म्हणाले की तुम्ही कुठेही तक्रार करा आमचे काहीच होणार नाही आमचे वरपर्यंत हात आहेत. तसेच आम्हाला तेवढेच काम नाही इतर कामही असतात .त्यामुळे एकीकडे चोर चोरी करून निघून जातात तर दुसरीकडे पोलीस प्रशासन नागरिकांना सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे यामुळे बोराडी सह परिसरात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा