Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
वनविकास महामंडळ नागपूरच्या मुख्य कार्यालयासमोर ०६ नोव्हेंबर पासून वन्यप्रेमी शेख जुनेद, माहिती अधिकार कार्यकर्ता तथा लोकसेवा हक्क संरक्षण महासंघाचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार....!
वनविकास महामंडळ नागपूरच्या मुख्य कार्यालयासमोर ०६ नोव्हेंबर पासून वन्यप्रेमी शेख जुनेद, माहिती अधिकार कार्यकर्ता तथा लोकसेवा हक्क संरक्षण महासंघाचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार....!
किनवटच्या वन प्रकल्प अंतर्गत शिवणी वनपरिक्षेत्र प्रशासनाकडून बेकायदेशीरपणे सागवान झाडे तोड करून महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान करून लाखो रुपये हडप करणाऱ्या प्रकरणाला उघडकीस येऊ न देता दडपण्यासाठीचा संबंधित सक्षम अधिकाऱ्यांचा खटाटोप
साक्री प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या वन प्रकल्प अंतर्गत शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालय येथील बेकायदेशीर पणे सागवान झाडे तोडून सागी लाकूड हडप करणाऱ्या संबंधित प्रशासनाच्या भ्रष्टाचार अपहारा प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात सबळ पुराव्यासह केलेल्या तक्रारीवर कायदेशिर कारवाई नाकारुन वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्ट लोकसेवक यांना अभय देऊन प्रकरण दडपण्याच्या विरोधात किनवट तालुक्यातील शिवणी येथील वन्यप्रेमी हे वनविकास महामंडळ नागपूरच्या मुख्य कार्यालया समोर दि.०६ नोव्हेंबर पासून आमरण उपोषणास बसण्याचे पत्र व्यवस्थापकीय संचालक व मुख्य महाव्यवस्थापक व महाव्यवस्थापक यांना दि १९ ऑक्टोबर रोजी दिले आहे.
या प्रकरणी वेळोवेळी या संबंधी माहिती व लेखी तक्रार दिली असून सुद्धा वरिष्ठ अधिकारी संबंधित लोक सेवकावर कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले असून सुद्धा कारवाई का होत नाही? हे प्रश्न निर्माण झाले आहे. वन्यप्रेमी शेख जुनेद यांनी वेळोवेळी सदर प्रकरणाचा लिखित व मौखिक व प्रत्यक्ष स्वरूपात पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने २६ जून रोजी अमरण उपोषणास बसले होते.तेंव्हा चौकशी समिती नेमवून उपोषण सोडण्यास भाग पाडले.या घटनेला सहा ते आठ महिने उलटून गेले.या नंतर पत्र व्यवहार करून सुद्धा सदरील प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप आला नाही.तर चौकशीचा अहवालाची वेळोवेळी मागणी करून सुद्धा अहवाल गुलदस्त्यात आहे.
या प्रकरणी सर्व वृत्तपत्र संस्था माध्यमांनी संबधित लोकसेवकावर कारवाई करण्यात यावी अशा शिर्षकाच्या बातम्या प्रसारित केले होते. यात वरिष्ठ अधिकारी यांच्याशी लोकसेवकाने हात मिळवणी केली की काय ? असा प्रश्न निर्माण होत असून सदरील चौकशी अहवाल व या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होई पर्यंत शांत बसणार नसल्याची चित्र स्पष्ट आहे.या संबधी ०६ नोव्हेंबर रोजी अमरण उपोषणास बसण्यासाठी संबधित विभागाकडे लेखी निवेदन दि.१९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात पुढील पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास दि.०६ नोव्हेंबर वन विकास महामंडळ मुख्य कार्यालय नागपूर येथे अमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्रात म्हंटले आहे.
चौकट-------
किनवट तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालया समोर दि ५ एप्रिल रोजी मौल्यवान सागवान साठा अस्त व्यस्त परिस्थितीत दिसून आले.या संबंधी वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांना विचारणा केले असता.मागील पंधरा दिवसापासून सदरील सागवान येथे आहे असे सांगण्यात आले.व ह्या सागवानी लाकडावर संबधित विभागाकडून मोजमाप पुस्तक,आवक जावक रजिस्टर,आदेश,व वाहतूक परवाना मागितले असता या संबंधी सदरील विभागाकडे कोणत्याच प्रकारची नोंद नसल्याचे आढळून आले.या वरून संशय निर्माण झाल्याने सदरील मौल्यवान सागवान आले कुठून आणि गेले कुठे ? असा प्रश्न निर्माण झाल्याने वन्यप्रेमी शेख जुनेद यांनी या संबंधी वरिष्टांकडे तक्रार दाखल करत संबंधित वनपरिक्षेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे अनेक वेळा देऊन सुद्धा कारवाई झाली नाही.तर यात वरिष्ठ अधिकारी सुद्धा संलग्न आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाले असून. कुंपणच शेत खात असेल तर रक्षण कोणी करावे असा सवाल उपस्थित होत असून सदरील प्रकरणात कारवाई होई पर्यंत शेख जुनेद शांत बसणार नसून दि.०६ नोव्हेंबर रोजी वनविकास महामंडळाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्याचे निवेदन दिले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा