Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

बोराडी येथे ग्रामस्थांचे पोलिसांविरोधात अनोखे आंदोलन. ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाहनास साखळी बांधून व कुलूप लावत केले आंदोलन.



बोराडी ता.शिरपूर प्रतिनिधी - बोराडी येथे दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झालेले आहे आहे.गत पंधरा दिवसापासून  सहा दुचाकी चोरीची मालिका सुरूच असून वाहन चोरी रोखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. तसेच दुचाकीचोरीबरोबरच इतर गुन्ह्यांच्या घटना ह्या देखील नित्याच्याच झाल्या आहेत.भरदिवसा ग्रामस्थांच्या घरासमोरून वाहनचोरीचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन आठवड्यात तब्बल सहाहुन अधिक दुचाकी चोरी झाली आहेत. यामध्ये सर्वांधिक वाहन चोरी ही बोराडी गावाच्या हद्दीत घडल्या आहेत.अश्यातच परवा रात्री ज्ञानेश्वर पाटील यांची घरासमोर लावलेली हिरो स्प्लेनडर,(क्र.एमएच18 ए.
एस-1126),ही दुचाकी चोरट्यांनी लांबवली.त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बोराडी येथील कार्यालयासमोर दुचाकी वाहनांना साखळी बांधून निषेध व्यक्त करत आंदोलन केले व पोलीस प्रशासनच्या विरोधात घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. 

दहशत पोलिसांची चोरांवर असायला हवे परंतु शिरपूर तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोरांची जनतेवर दहशत निर्माण झाली आहे.मात्र  लाखोंच्या किंमतीची वाहने चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा तपास पोलिसांनी न लावल्यास गृह मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा योगेश मधुकर पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या निष्काळजीपणा मुळेच चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.. 

याप्रसंगी शालिकराव पाटील,बल्लू पाटील,निंबा पाटील,रवींद्र पाटील,संजय पाटील,श्रीकांत पाटील,देविदास पाटील,प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध