Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३
कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय संमेलन कुंभ नगरी नाशिक मध्ये उत्साहात संपन्न...!
साक्री प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी लढा देणारे व भ्रष्टाचार मुक्त राष्ट्राची स्वप्न पाहणाऱ्या अभ्यासक कायदा प्रेमींसाठी राज्यस्तरीय संमेलन रविवार दि.०५ नोव्हेंबर २०२३ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. सदर संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कायदा प्रेमी उपस्थित होते.
संमेलनाची सुरुवात मुख्य अतिथी सेवानिवृत्त माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे, व्याख्याते के. व्ही.जे. राव यांचे हस्ते दीप प्रज्वलन व संविधान पूजनाने करण्यात आली. संमेलनास तज्ञ व्याख्याते उपस्थित राहिल्यामुळे कायदा प्रेमींना उत्तम मार्गदर्शन करून त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. सदर संमेलनात सेवानिवृत्त माहिती आयुक्त मा. संभाजी सरकुंडे, श्री कमलाकर शेनॉय यांचे माहिती अधिकार कायद्यावर तर श्री के.व्ही जे. राव यांचे भ्रष्ट लोकसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत तर गौरंग व्होरा, सुरेश लोखंडे, स्वरूप कुलकर्णी या मुंबईहुन आलेले तज्ञ व्याख्यात्यांनीही कायद्यावर व्याख्यान झाले. न्यायमूर्ती वसंत शिवराम पाटील यांनीही सर्वसामान्य कायदा प्रेमी प्रमाणे स्वागतमुल्य भरून ऐनवेळी संमेलनात सहभाग घेत प्रेक्षकांमध्ये बसले. ही बाब आयोजकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना व्यासपीठावर विराजमान करण्यात आले.
या अधिवेशनास अनेक तज्ञ ,अनुभवी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत समाजासाठी निःस्वार्थी हेतूने व्यापक जनहितासाठी काम करताना त्यांना आलेल्या अनुभवाची देवाण-घेवाण केली.
माहिती अधिकार अधिनियम 2005,लोकसेवा हक्क अधिनियम 2015, दप्तर दिरंगाई ,अभिलेख व्यवस्थापन, ग्राहक संरक्षण कायदा तसेच इतरही कायद्यांवर अभ्यास करणारे तसेच सदर अधिवेशनास उपस्थित कायदा प्रेमींना काम करताना येत असलेल्या विविध प्रकारच्या समस्या / अडचणी बाबत प्रत्यक्ष संवाद साधता आले.
कायद्याचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी व्यापक जनहितासाठी लढा देणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सुजाण नागरिक संमेलनात सहभागी झाले तसेच परिचयातील नागरिकांना सहभागी करून घेतले. कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा न करता माहितीचा अधिकार अधिनियम २००५ व इतर कायद्यान्वये भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी निस्वार्थीपणे लढा देणारे कायदा प्रेमींनी कायदा प्रेमींसाठी स्वयंस्फूर्तीने भरवला होता
बाहेर गावातून येणाऱ्या नोंदणीकृत कार्यकर्त्यासाठी एक दिवस आधी येणाऱ्या कायदा प्रेमींची निवास व भोजनची व्यवस्था करण्यात आली तसेच अधिवेशनाच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यासाठी सकाळीं चहा - नाश्ता व दुपारच्या जेवणाची व्यवस्था संध्याकाळी चहा कॉफी ची व्यवस्था केलेली होती.
सदर संमेलन कुठलेही व्यक्ती विशेष व संस्थेच्या बॅनरखाली न होता महाराष्ट्र संबंध कायदा प्रेमींनी कायदा प्रेमींसाठी हे संमेलन आयोजित केले. सदर संमेलनात भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र होऊ पाहणाऱ्या महाराष्ट्रतील कानाकोपऱ्यातून कायदा प्रेमी सहभागी झाले व तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शनाचा लाभ घेतला त्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कायदेविषयक अभ्यासक कायदा प्रेमींची यांच्या लोकसहभागातून स्वागत मूल्य देऊन कार्यक्रमास शोभा वाढविली.
भविष्यात अशा प्रकारचे कायदा प्रेमींचे संमेलन प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याचा मनोभाव प्रत्येक कायदाप्रेमी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सुत्रसंचालन गणेश शिंदे, पंढरीनाथ कन्नोर यांनी केले तर राजेंद्र नानकर व विठोबा द्यानद्यान यांनी आभार मानले. संमेलन यशस्वीतेसाठी प्रकाश उघडे पुणे, प्रशांत देशमुख नाशिक, सुनील गुजर मावळ, बाळकृष्ण मते, अनिल शहारे नाशिक, प्रदिप यादव नाशिक, रमेश बो-हाडे पुणे, अरून पाटील माऊली मालेगाव संदिप गाढवे वाई, युवराज पोटे पुणे, अमोल पाटील अकोला, राजेश लाड दौंड, साहिल द्यानद्यान नाशिक आदिंनी परिश्रम घेतले.
प्रेषक :- निलेश तोरवणे.
भ्रमणध्वनी :- 7756930103
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा