Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शहादा पोलिसांची कारवाई ; गुटख्याच्या ट्रकसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त...! मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी..!
शहादा पोलिसांची कारवाई ; गुटख्याच्या ट्रकसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त...! मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी..!
शाहदा प्रतिनिधी:- शहादा, ता.२८ मध्य प्रदेशातील खेतियाकडून येणाऱ्या ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला आठ लाख ९८ हजार ५६० रुपये किमतीचा सुगंधी गुटखा, पानमसाला व सहा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १४ लाख ९६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला.
गोपनीय माहितीचा आधार घेत शहादा शहरास लागून असलेल्या लोणखेडा बायपास रस्त्यावर नियोजित नवीन बसस्थानकासमोर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता परचुटन मालाच्या आडोशाला सुगंधी मसाला व इतर पानमसाला आढळला. या कारवाईमुळे प्रतिबंधित पानमसाला अवैध मार्गाने विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा
निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र ठिकठिकाणी नाकेबंदी सुरू आहे. याच अनुषंगाने शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत पंधरा दिवसांपासून नाकेबंदी करत आहेत. शनिवारी (ता. २८) त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलिस कर्मचारी नवीन बसस्थानकासमोर सापळा रचून होते. दुपारी चार- साडेचारच्या दरम्यान खेतिया ते शहादा मार्गावर नवीन बसस्थानकासमोर वाहन (एमपी ०९, जीजी ००११) थांबवून ट्रकमधील मालाची खात्री केली असता परचुटन मालाच्या आडोशाला महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी पानमसाला व तंबाखू चोरट्या माग विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक है असताना मिळून आले. ट्रक (एम ०६, जीजी ००११) ची तपासणी के असता पानमसल्यासह १४ लाख हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल मिळाल संशयित आरोपी भगवान उत्तम बोरसे विल्सन रायरबोर्ड डागोटी (रा. खेतिय मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाख करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत होती.
पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील अपर पोलिस अधीक्षक नीलेश ताबे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाहदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे, पोलिस शिपाई मुकेश राठोड राकेश मोरे, भरत उगले, दिन चव्हाण, संदीप लांडगे यांच्या पथक कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा