Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

एसटी चालकाकडून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या कामासाठी दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले



नंदूरबार(प्रतिनिधी):-एसटी चालकास फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट मिळावे याकरिता नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा ग्रामीण सफाई कामगार, व एका खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून असलेल्या व्यक्तीने संगनमत करून बारा हजार रुपयाची मागणी करून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट मिळवण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयेची लाच स्वीकारताना नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. याबाबत सविस्तर असे की, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील तक्रारदार यांनी यातील आरोपी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात सफाई कामगार पदावर असलेल्या जयेश शंकर तेजी व त्याचा जोडीदार खाजगी चालक तुकाराम भिला भोई या दोघांनी संगणमत करून सदर तक्रारदार एसटी महामंडळ नंदुरबार येथे चालक म्हणून कार्यरत असून, तक्रारदार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव तक्रारदार हे मे 2023 पासून वैद्यकीय रजेवर होते, तक्रारदार यांची प्रकृती आता व्यवस्थित झाल्याने त्यांना नोकरीवर हजर व्हायचे होते, यासाठी तक्रारदार यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेटची गरज होती, यासाठी तक्रारदार यांनी फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट मिळविण्यासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येथे लागणाऱ्या  कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी गेले होते.

यादरम्यान यातील आरोपी जयेश शंकर तेजी धानोरा ग्रामीण रुग्णालयात नोकरी सफाई कामगार पदावर असलेले व त्यांच्या समवेत नंदुरबार येथील तुकाराम भिला भोई खाजगी चालक यांनी तक्रारदार यांच्याकडून सदर फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट या कामासाठी बरा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली व तडजोअंती दहा हजार रुपयाची मागणी केली व दहा हजार रुपये स्वीकारताना नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट मिळून देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष दहा हजार रुपये एवढी रक्कम स्विकारताना नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी व त्यांच्या पथकातील सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक माधवी वाघ यांच्या समावेत पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस हवालदार विलास पाटील, पोलीस हवालदार देवराम गावित, पोलीस हवालदार अमोल मराठे, पोलीस हवलदार विजय ठाकरे, महिला पोलीस हवालदार ज्योती पाटील, पोलीस नाईक संदीप नावडेकर, पोलीस नाईक मनोज अहिरे व चालक पोलीस नायक जितेंद्र महाले या सर्वांनी नाशिक परिक्षेत्र नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालवलकर, अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र माधव रेड्डी, वाचक पोलीस उपाधीक्षक नसतोच प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या परिसरात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध