Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३
माय म्हने तिरंगाम्हा.......
वाघाडी प्रतिनिधी:- वाघाडी दि. 16/11/23 रोजी वाघाडी ता.शिरपूर येथे मातृभुमी क्रिकेट क्लब मार्फत मुक्काम पोष्ट खान्देश हा कविता माय माटीन्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड बाबा पाटील होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वाघाडी गावाचे सरपंच श्री किशोर माळी हे होते.
सर्व प्रथम शहिद मनोज माळी यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सामाजीक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आले.
यात श्री रमेश टोपे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मातृभुमी क्लबचे अध्यक्ष गणेश ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. तर श्री वाल्मिक देवरे यांना माजी सरपंच बाबा पाटील व माजी उपसरपंच सुनिल बाविस्कर यांच्या हस्ते सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला.शहिद मनोज माळी यांच्या विर माता पित्याचा सन्मान करत त्यांना साळी चोळीचा टोपी रूमालचा आहेर देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर भामरे यांनी करत कार्यक्रम आयोजना मागची भुमिका विशद केली. यानंतर कवि संमेलनात आमंत्रित कवींचे कवी संमेलनाला सुरूवात करण्यात आली.
यात प्रविण पवार यांनी महाभारत ही कविता सादर करून सध्याच्या राजकारणावर ताशेरे ओढत भाष्य केले. कवी वाल्मिक अहिरे यांनी तिरंगाले दखी दखी माय म्हनी रडस ही कविता सादर करत सामाजिक दरी आणि विषमतेवर ताशेरे ओढले.यानंतर कवी डाॅ. कुणाल पवार यांनी दारूबाजाच्या वागण्यावर आधारीत मी पिन्हूका मंग...ही कविता सादर करत सभागृहाला पोट धरून हसवलं.
यानंतर विनोद बागुल यांनी नदी थडीवर....ही दमदार प्रेम कविता सादर करत तरूणांच्या काळजाला हात लावत गुलाबी वातावरण तयार करत दमदार माहोल तयार केला.
यानंतर ज्ञानेश्वर भामरे यांनी येडं कुत्र हि कविता सादर करत प्रेमाची ताटातुट काय असते हे सादर करत दाद मिळवली.यानंतर शरदधनगर यांनी पिरेमनी करम कहानी ही हास्य कविता सादर करत वातावरण तयार केले.
दुस-या राऊंडमध्ये सामाजिक कवितांवर भाष्य करत देशातल्या विविध समस्यांवर ,सामाजिक वातावरणावर मार्मिक भाष्य केले.
संमेलनाच्या शेवटी कवी विनोद बागूल यांनी -- माय म्हणे तिरंगाम्हा गुंडाईसन उनथा-- ही शहिद जवानाच्या जीवनावर आधारीत कविता सादर केल्यावर उपस्थितांना अश्रू अनावर झालेत.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा.डाॅ. सदाशिव सुर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन हे संत चौधरी समाज भवनाच्या सभागृहात करण्यात आले.श्री ज्ञानेश्वर भामरे यांनी आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा