Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच जीवन देणाऱ्या झाडांची कत्तल करू नका : आ. अमरिशभाई पटेल यांचे भावनिक आवाहन....
आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच जीवन देणाऱ्या झाडांची कत्तल करू नका : आ. अमरिशभाई पटेल यांचे भावनिक आवाहन....
शिरपूर प्रतिनिधी : आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच जीवन देणाऱ्या झाडांची कत्तल करू नका असे भावनिक व कळकळीचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी नागरिकांना केले आहे.
शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या माध्यमातून मी गेल्या 35 वर्षांपासून हजारो लिंबाची झाडे लावली व जगवली. त्यांचे रूपांतर महाकाय वृक्षांमध्ये केले यामुळे शिरपूर शहराचे वातावरण भरपूर ऑक्सिजन देणारे शहर ठरले आहे, अतिशय पोषक पर्यावरण पूरक हजारो झाडे असलेले शहरातील अनेक ओपन स्पेस हे शिरपूर शहराचे फुफ्फुस आहे.
त्यांना आम्ही जिवापाड प्रेम करून मनापासून जोपासले आहे, झाडांची कत्तल करू नका, माणूस अनेक दिवस अन्न व पाण्या वाचून राहू शकतो पण ऑक्सिजन शिवाय मुळीच राहू शकत नाही. ऑक्सिजन देणाऱ्या लिंबाच्या व इतर झाडांना टिकवणे व वाढवणे, त्यांचा आनंद घ्यावा, हे सर्व आपल्यासाठी आहे, शहरासाठी आहे. शहराच्या सौंदर्यामध्ये त्यामुळे अधिक भर पडली आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे"
मुंबई, दिल्ली व इतर अनेक शहरे भारतातील प्रदूषित शहरांमध्ये अग्रक्रमांकावर गेल्याचे दुर्दैवी चित्र आपण सर्वजण पाहत आहोत. या सर्व तुलनेत आपण शिरपूर शहराला खूप चांगले घडविले आहे, गेल्या 35 वर्षांच्या कालावधीत शहरात हजारो लिंबाच्या झाडांसह असंख्य सोयी सुविधा आपण सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केलेले आहेत. वृक्ष लागवडीवर आपण विशेष लक्ष देऊन दिले आहे.
आता करवंद गावाजवळ वन खात्याकडून 60 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे, त्याबाबत शासनाची परवानगी नुकतीच प्राप्त झाली आहे. तसेच असली येथे 100 पेक्षा जास्त एकर जमीन शासनाच्या परवानगीने वृक्ष लागवडीसाठी घेऊन त्या ठिकाणी 20 हजार वृक्षांची लागवड आपण केलेली असून त्याचे पुढील अनेक वर्ष आपण जतन व रक्षण करून शिरपूर तालुक्याला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय निरोगी तालुका म्हणून निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. शहरात ज्या ठिकाणी रिकामी जागा, रिकामे प्लॉट असतील त्या ठिकाणी देखील नगरपालिकेशी संपर्क साधून वृक्ष लागवडीसाठी सेवाभावी नागरिकांनी योगदान द्यावे.
एकीकडे एवढी सगळी धडपड वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन साठी करत असताना दुसरीकडे शहरातील ओपन स्पेस मधील असंख्य झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचे चित्र मनाला वेदना देणारे आहे. म्हणून कृपया शहर व तालुक्यातील नागरिकांनी झाडांची कत्तल कोणत्याही परिस्थितीत करू नये असे मी आवाहन करत आहे. तसेच सर्व सोसायटी ने देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना मोकळ्या जागेवरील वृक्षांची कत्तल करू देऊ नये असे भावनिक आवाहन आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा