Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ मे, २०२४

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री धुळे लोकसभा विद्यमान खा.व महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांची घेतली साक्री तालुका वासियांना सामूहिक भेट



काल साक्री येथे सु मंगल लॉन्स वर धुळे लोकसभा चे लोकप्रिय खासदार माझी संरक्षण राज्यमंत्री डाँ.सुभाषजी भामरे यांची प्रचार सभा साक्री येथे आयोजित केली होती साक्री तालुक्यातील कैं.दादासाहेब रामराव सिताराम पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम साक्री तालुका वासियांना आपल्या साक्री तालुक्याचे भूमिपुत्र डॉ.बाबासाहेब सुभाष भामरे यांनी भावनिक साद घालत साक्री तालुक्यातील जनतेचे धुळे लोकसभा मतदारसंघात जे कोणी आपले हितचिंतक मित्रपरिवार नातेवाईक असतील त्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेऊन डॉ.बाबांसाठी भाजपाला मतदान करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे व पुन्हा एकदा डॉ.सुभाष भामरे यांना खासदार करून आपल्या तालुक्याचे नावलौकिक करायचा आहे.येणाऱ्या काळात देखील बाबांना मंत्रिपदाची पुन्हा संधी मिळण्याचे संकेत आहेत.मात्र त्यासाठी मालेगाव शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला म्हणजेच महाविकास आघाडीला सुमारे दीड ते दोन लाख लीड असणाऱ्या मुस्लिम बहुल मतांना पार करण्यासाठी शिंदखेडा मालेगाव ग्रामीण बागलाण व धुळे ग्रामीण धुळे शहर येथे अधिकचे मताधिक्य मिळवणे गरजेचे आहे.असेही यावेळेस डॉ सुभाष भामरे यांनी बोलताना सांगितले तसेच नंदुरबार लोकसभेचे 13 तारखेचे मतदान झाल्यानंतर आठ-दहा दिवस डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी वेळ द्यायचा आहे अशी मागणी जिल्ह्याचे नेते  भाजपच्या प्रांतिक सदस्य आबासाहेब सुरेश रामराव पाटील यांनी साक्री तालुका वासियांना केली  साक्री तालुक्यातील जनतेने देखील बाबांना शब्द दिला की आम्ही आपल्याला पाहिजे ते सहकार्य करू अशी ग्वाही तालुका वासीयांनी यावेळी बाबांना दिली.तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय संसद रत्न खासदार डॉ.हिना गावित यांना ही प्रचंड मतांनी निवडून दिल्ली लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवायचे आहे.व पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेबांना पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी आपल्याला कंबर असायचे आहे त्याप्रसंगी साक्री तालुक्यातील लोकप्रिय आमदार मंजूळाताई गावित धुळे जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय आबासाहेब सुरेश रामराव पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुळशीरामजी गावित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुरेश सोनवणे व पोपटराव सोनवणे विजय भामरे भाडण्याचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे शिवसेनेचे पंकज दादा मराठे साक्री तालुका मनसे अध्यक्ष धीरज देसले जिल्हा परिषद सदस्य गोकुळ दादा परदेशी,वसंतजी घरटे एडवोकेट एखंडे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब चंद्रजीत पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते केवळ त्यांच्या एका सोशल मीडिया मेसेजवर आवाहन करून हजारो संख्येने कार्यकर्ते व बाबासाहेबांना मानणारे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चा जनसागर उसळला होता यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष भाजपाचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष व विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध