Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ मे, २०२४

डॉ.हिना गावित यांच्या प्रचारासाठी सभापती सौ.लता पावरा यांच्या नेतृत्वात दुर्बळ्या परिसरात प्रचारात आघाडी



शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या मतदारांशी बोलीभाषेत संपर्क व संवाद साधून पंचायत समिती सभापती सौ.लता पावरा यांच्या नेतृत्वात महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी प्रचारात विशेष आघाडी घेतली आहे.
सौ.लता पावरा या स्वतः दुर्बळ्या गाव व परिसरात भाजप व महायुती उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ फिरत आहेत.त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.आदिवासी भाग असल्याने तेथील मतदारांना त्या घरी जाऊन भेट घेत आहेत.गेली दहा वर्षे मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती बोलीभाषेत संवाद साधून देत आहेत.उज्ज्वला गॅस योजना,आदिवासी समाजाच्या महिला,बेरोजगार यांच्यासाठी असलेल्या विविध योजना,आरोग्य योजना यांची माहिती त्या देत असून खासदार निधीतून झालेली स्थानिक कामे हे मतदारांना सांगण्याचे काम प्रचारातून होत आहे.
या प्रचारात सौ.लता पावरा यांना त्यांचे पती व माजी सभापती वसंत पावरा,सरपंच,सर्व सदस्य,सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभत आहे.बोलीभाषेत संपर्क करण्याच्या पद्धतीने मतदार आकर्षित होत आहेत.त्यांना सरकार व खासदार यांचे कार्य याची माहिती यामुळे मिळत आहे.परिसरातील गावे, पाडे याठिकाणी प्रचाराला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सभापती सौ.लता पावरा यांनी केला आहे.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत असल्याने मतदार समाधानी असून त्यांना पुन्हा पंतप्रधान करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.डॉ.हिना गावित यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी महिलांचा सहभाग या भागात दिसत असून गावित यांना खासदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध