Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ जुलै, २०२४

संस्था अध्यक्षाने केला पदाचा गैरवापर....! शाळेच्या आवारातच केला स्वतःच्या शेतीसाठी बोअरवेल...!



शिरपूर प्रतिनिधी:- शिक्षण संस्था हे ज्ञान दानाचे काम करतात.खेडोपाडी सुरू झालेल्या संस्था ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या शैक्षणिक विकासासाठी सुरू करण्यात आल्यात. आज या संस्थामध्ये ज्ञानदान हे फक्त नावालाच उरले असून , शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष  हे शिक्षणापेक्षा स्वतःचे हित जोपासण्यातच मग्न आहेत.शिरपूर तालुक्यातील जनता शिक्षण प्रसारक संस्था बेटावद संचलित महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथील शाळेच्या परिसरातच संस्थेचे अध्यक्ष यांनी स्वतःचा शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी बोअरवेल करून थेट शेतापर्यंत शाळेचा मैदानातून पाईप लाईन खोदून नेली आहे. शैक्षणिक संस्थेची जागा परिसर हा अध्यक्ष यांना स्वतःच्या हितासाठी वापरता येतो का ? हा सर्व प्रकार अनधिकृत असल्यास  संस्थेचे अध्यक्ष यांच्यावर कारवाई होणार का ? असे एक ना अनेक प्रश्न मांजरोद व परिसरातील जनतेच्या मनात आहेत.शिक्षण विभाग व धर्ममदा आयुक्त या सर्व गैरकारभाराविरुद्ध कारवाई करणार का ?
     
शासनाच्या नियमांची पायमल्ली करून आर्थिक स्वार्थापोटी व खाजगी संस्था अधिनियम धाब्यावर बसवून फक्त स्वतःचा आर्थिक हित अध्यक्ष साधत आहेत.याविरुद्ध गावातील व परिसरातील जनता शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करून जाब विचारणार असल्याची वार्ता तरुण गर्जना टीमच्या हाती लागली आहे.  शासनाकडे पाठपुरावा करून संस्थेवर प्रशासक नेमून अध्यक्षासह संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध