Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ जुलै, २०२४

आपले सरकार सेवा केंद्र चालक व सीएससी केंद्र चालकाच्या विविध अडचणी व समस्या सोडविन्यासाठी एक दिवसीय संप..



रावेर तालुका प्रतिनिधि आज दिनांक 8 रोजी तहसीलदार बंडु कापसे याना  सीएससी व आपले सरकार सेवा केंद्र चालक,आम्ही सर्व असे निवेदन देतो की.मा.मुख्यमंत्री साहेब आपण राज्यातील गोरगरीब जनतेसाठी तसेच नागरिकांसाठी विविध उपाययोजना ह्या आपण राबवत आहात व अमलात आणत आहात त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन परंतु या योजना तळागाळापर्यंत नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही आपले सेवा केंद्र चालक व सीएससी केंद्र चालक हे आपल्या शासनाच्या विविध सेवा योजना प्रमाणपत्रे दाखले बी टू सी सेवा जी टू सी सेवा ह्या नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचे काम कोणी करत असेल तर ते आम्ही केंद्र चालक आहोत त्याला आपले शासनाचे मार्गदर्शन निश्चितच आहे.

आम्ही सर्व केंद्रचालक मिळून आपले सरकार सेवा केंद्र द्वारा महाराष्ट्र शासनाचे विविध दाखले व इतर योजना नागरिकापर्यंत पोहोचण्याचे काम आपल्या सेवा केंद्र चालक गेली कित्येक वर्षे करत आहे. परंतु दिवसेंदिवस वाढती महागाई व इतर गोष्टीची होणारी वाढ याचा विचार करून केंद्र चालकांना मिळणारे तुटपुंजे शेअर्स 2012 ते 14 त्यानंतर कधीही वाढ केली किंवा करण्यात आलेली नाही. शासनामार्फत ज्या योजना राबवण्याचे काम आम्ही रात्रंदिवस करतो आहोत. त्यासाठी शासनाकडून आम्हाला अत्यंत तुटपुंजे असे मानधन देण्यात येत आहे की ज्या मानधनाने आमची कुटुंबाचा उदरनिर्वाह उपजिवीका चालवणे सुद्धा अत्यंत कठीण होत आहे. आजच्या काळात भरपूर महागाई झालेली आहे सर्व गोष्टीत भाव वाढ झालेली आहे परंतु आम्हाला देण्यात येणाऱ्या मानधनात शेअर्समध्ये गेली बारा ते पंधरा वर्षे कुठल्याही प्रकारची वाढ किंवा त्या दराचा पुन्हा विचार करण्यात आलेला नाही तरी आपणास कळकळीची विनंती करण्यात येते की सदरील योजनेसाठी किंवा सदरील सेवा देण्यासाठी जो काही महिन्यात खर्च मानसिक व शारीरिक त्रास आहे.

तो सहन करून आम्ही इतक्या वर्षी कुठलीही तक्रार न करता काम करत आहे. तरी आपण गोरगरिबाचे कैवारी म्हणून ओळखले जातात. तसेच आपण सर्व घटकांचा समावेशक विचार करता त्या दृष्टीने आपण आम्हा सीएससी केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांचाही विचार करावा, शासनाच्या विविध योजना जसे की कर्जमाफी, दुष्काळाची अनुदानाची केवायसी, शासकीय दाखले, आयुष्मान सेवा, श्रम कार्ड, मतदान कार्ड, पिक विमा योजना, आधार सेवा. आयकर सेवा, इत्यादी सर्व सेवा आम्ही आजपर्यंत सर्व जनतेला रात्रं-दिवस देत आलेलो आहोत. मात्र शासनाकडून अद्यापही कोणताच या योजनांच्या मोबदल्यात काही मिळाले नाही. तसेच "माझी लाडकी बहिण योजना" आपण आणली सदर योजनेचे फॉर्म भरावयास आम्ही सर्व केंद्र चालक तयार आहोत. आम्ही ज्या ज्या नागरिकांचे अर्ज परिपूर्ण भरून सरकार दरबारी ऑनलाईन माध्यमातून दाखल करणार आहोत. त्या सर्वांचे मानधन आम्हाला किमान 100 रुपये/प्रती फॉर्म देण्याची कृपा करावी. तसेच आमचे मानधन कशा माध्यमातून देण्यात येणार याचेही उत्तर द्यावे,

तरी आपणास पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की आपण आमचा विचार करून योग्य तो निर्णय देऊन आमचा उदरनिर्वाहाचा व राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नक्कीच योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला अपेक्षा आहे आपण आम्हा आपले सरकार व सीएससी केंद्र चालकांचा विचार कराल. अन्यथा आम्हा सर्व आपले सरकार व सीएससी केंद्र चालकांना लोकशाही मार्गाने उपोषणाला बसावे लागेल.

माहितीस्तव प्रत 

01) तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय रावेर . 02) जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव 

तहसिलदार बंडू कापसे , निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, व लिपिक प्रवीण पाटील यांना दिलेल्या निवेदनावर खालील स्वाक्षरी करणार आपले केंद्रचालक अध्यक्ष धनराज घेटे, नकुल बारी, संतोष पाटील,निलेश नेमाडे, प्रदीप महाजन ,विजय पाटील , प्रदीप पाटील, राहुल गाडे, वैभव तायडे, अमोल बारी, चेतन बारी, राजेंद्र अटकाळे यासह असंख्य मोठ्या संख्येने सेतू सुविधा केंद्र चालक उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध