Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ जुलै, २०२४

मालेगाव शहर व तालुका भोई समाज युवा मंच तर्फे आयोजित १०वी आणि १२ वी चे विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम संपन्न...



मालेगाव येथे ३०/०६/२०२४ रोजी मालेगाव शहर व तालुका भोई समाज युवा मंच तर्फे आयोजित १०वी आणि १२ वी चे विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मानित श्री जितेंद्र धनराळे साहेब ना.
तहसीलदार चाळीसगाव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेशभाऊ सपकाळ तसेच श्री दिलीप खेडकर सर, श्री दिलीप जावरे सर, श्री अण्णासाहेब मोरे साहेब,श्री बापूसाहेब मोरे,श्री विकास खेडकर, श्री शंकर शिवदे, कैलास ढोले, रवींद्र ढोले लाडे सर, संजय शिवदे मनोज मोरे ई भोई समाज युवा मंचचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणत एकत्र येवून मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि प्रोत्साहन पर गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देवून विद्यार्थी व पालक यांना सन्मानित करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध