Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ जुलै, २०२४

प्रति पंढरपूर बाळदे आषाढी एकादशीनिमित्त येथे यात्रा उत्सवाची जय्यत तयारी...!



उंटावद वार्ताहर शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेले बाळदे येथे आषाढी एकादशी निमित्त दिनांक 17 जुलै 2024 रोजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेनिमित्त मंदिर परिसरात व्यवसायिक दुकानदारांसाठी जेसीबी मशीन लावून जागेची स्वच्छता  करण्यात आली आहे तसेच मंदिरातील मूर्तींना रंग रंगोटी ची कामे मंदिर ट्रस्टमार्फत सुरू आहे.

देवदर्शनाचा सुलभ लाभ घेता यावा म्हणून शिरपूर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी नुकतीच मंदिराला भेट दिली व यात्रेनिमित्त वाहन पार्किंग व मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडू नये यासाठी स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे 

पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी  वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, व्यावसायिक दुकानदारांसाठी जागेची व्यवस्था, इत्यादी संपूर्ण व्यवस्था यात्रेनिमित्त करण्यात आलेली असून श्री विठ्ठलधाम मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. 
निसर्गरमणीय, भव्य सभा मंडप, मंदीरात महाराष्ट्रातील सर्वच संताची स्थापना करण्यात आलेली असल्यामुळे खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून जागृत संस्थान म्हणून प्रसिद्ध झालेले आहे.
     
यात्रे निमित्त जय्यत तयारी श्री तापी परिसर विठ्ठलधाम मंदीराचे अध्यक्ष श्री ह.भ.प.वारकरी भूषण माजी आमदार संभाजीराव हिरामण पाटील.माजी जि. प.सदस्य जितेंद्र संभाजीराव कुवर विश्वस्त दुष्यंत मनोहर पाटील सचिव निंबा पाटील संत ज्ञानेश्वर भंजनी मंडळ, व समस्त ग्रामस्थ मंडळी विठ्ठलधाम बाळदे, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय पळासनेर, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय बाळदे, ग्राम पंचायत बाळदे, विविध कार्यकारी सोसायटी बाळदे परिश्रम घेत आहेत . तरी  भाविकांनी येऊन श्री पांडुरंगाच्या देवदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संभाजीराव हिरामण पाटील यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध