Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ जुलै, २०२४

विद्यार्थ्यांचे यश पाहुन‌ उज्वल भविष्याची खात्री : माजी आमदार बापूसाहेब रावल दोंडाईचा येथील स्वामी विवेकानंद स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!



दोंडाईचा (प्रतिनिधी):  दहावी वर्गातील विद्यार्थी मित्रांचे शैक्षणिक यश पाहून त्यांचे भविष्य उज्वल आहे याची शंभर टक्के खात्री आहे. स्कूलचा शंभर टक्के निकाल पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या परिश्रमाचे फलीत आहे. तर शेतकरी, कष्टकरी, सामान्य व्यापारी ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या जास्त आहे. तालुक्यातील गरीबांच्या मुलांना नाममात्र शुल्कात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण मिळावे हा शुद्ध हेतू ठेवून स्वामी विवेकानंद स्कूलची मुहूर्तमेढ रोवली होती. आज विद्यार्थी मित्रांचे यश पाहून उद्देश सफल झाल्याचा आनंद आहे. यापूर्वी देखील हजारो विद्यार्थी या शाळेतून यशस्वी झाली आहेत. खेळ, कला, क्रिडा, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषि, राजकारण, समाजकारण, शासन, प्रशासन, उद्योग, व्यापार अशा एक ना अनेक क्षेत्रात त्यांची‌ यशस्वी वाटचाल सुरू आहे. जिवनात दहावी बारावी दोन्ही महत्वाचे टप्पे आहेत ते यशस्वी पार करत चला!  तर आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच असे प्रतिपादन माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी केले.

दोंडाईचा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने इयत्ता १० वी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शाळेत नुकताच पार पडला. स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष तथा माजी आमदार वृक्षमित्र बापूसाहेब रावल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा राजपूत उपस्थित होते. तर व्यासपीठावर ज्योत्स्ना मेहता, मुमताज बोहरी, अनिता जयसिंघाणी यांची उपस्थिती होती. यावेळी बापूसाहेब रावल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच राेख बक्षीसे देवुन गोैरव करण्यात आला. शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही १००% लागला आहे.
 
त्यात प्रथम क्रमांक ईशी वैभव अनिल (८९.६०% ,५३०१ रुपये रोख रक्कम), द्वितीय क्रमांक दिव्या मुकेश गुरव (८७.२०%, २२०१ रुपये रोख रक्कम), तृतीय क्रमांक लोकेश जितेंद्रसिंह गिरासे (८६.४०%, ११०१ रोख रक्कम) बक्षीस स्वरूपात देऊन गौरविण्यात आले. 

तर इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन सन्मान केला. विद्यार्थी मित्रांना सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री खारकर यांनी केले. सरोजिनी यु.पी, अंबिका जाधव, शितल जगताप, विशाल माळी, प्रवीणबाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कॅप्शन: दोंडाईचा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्या हस्ते दहावी वर्गातील गुणवंत विद्यार्थांना बक्षीसे देवुन गोैरविण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा राजपूत आदी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध