Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ जुलै, २०२४

वन महोत्सव निमित्त वन अधिकारी यांचे तालुक्यात दुर्लभ दर्शन...



पंकज पाटील (उपसंपादक) 
अमळनेर तालुक्यात वन महोत्सव निमित्त वन अधिकारी यांचे तालुक्यात दुर्लभ दर्शन झाले.त्यांच्या प्रकट दिनी 
त्यांनी अमळनेर तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी अमळनेर बस स्थानकाजवळ दर्शन दिले .त्याच बरोबर त्याच ठिकाणी नागरिकांना वृक्ष वाटप देखिल केले.अमळनेर तालुक्यात वर्षभर वृक्ष तोड सुरू असताना हेच वन अधिकारी चुकूनही कोणाच्या नजरेला पडत नाही. यांच्यासमोरून लाकडाची गाडी अथवा ट्रॅक्टर भरून गेला तर हे स्वतः हुन वाट बदलून घेतात.वृक्ष तोडीचा ट्रॅक्टर अथवा गाडी कुणाची हे देखील त्यांना माहीतच असते.पडद्याआड खूप काही आर्थिक उलाढाली होत असतात त्याचेच फलस्वरूप म्हणून वाट चुकवली जाते. त्यातही चुकून कुणी वृक्ष प्रेमीने फोन केला तर यांचा फोन कधीच लागत नाही .फोन लागलाच तर मी त्याठिकाणी नाही तुम्ही ट्रॅक्टर धरून ठेवा असे धाडसी निर्णय ते वृक्षप्रेमी लोकांना देतात व नंतर फोन नोट रीचेबल होतो.

सर्व सामान्य जनतेला नेहमी हा प्रश्न असतो वर्ष भर वृक्ष तोड होत असताना वन अधिकारी कुठे असतात असंख्य जुन्या व डेरेदार जिवंत झाडांची कत्तल होते.वृक्ष लावणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे पण वृक्ष तोड थांबावी यासाठी अधिकारी मात्र उदासीन व हतबल झालेले दिसतात ते आर्थिक दबावामुळे किंवा राजकीय वरद हस्तामुळे हे सर्वसाधारण जनतेला अजूनही समजलेले नाही.वन अधिकारी यांचे हे कागदी घोडे पडवण्याचे काम अजून किती दिवस चालणार व प्रत्यक्ष वृक्ष तोड कधी थांबणार हा प्रश्न कायम असणार आहे.असे कितीही वनमहोत्सव झाले तरी वनाधिकारी यांच्याकडून तालुक्यातील वृक्षांची संख्या कधीही वाढणार नाही.वृक्षांची कत्तल अजून थांबलेली नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध