Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ६ जुलै, २०२४

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शाळेने बेकायदेशीर पणे केलेली फी वाढ रद्द करावी.... पालक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालकांचे धरणे आंदोलन..



मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदीर व आदर्श शिशू विहार उत्तम नगर सिडको नाशिक या दोनही शाळांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाळा अनुदानित असून सुद्धा मागील वर्षांपासून शाळेची 1500 रुपये व बसची 1000 रुपये फी वाढ केलेली आहे.


या संधर्भात गेल्या एक वर्षांपासून शाळा, संस्था, व शिक्षण विभागातील मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. तसेच शाळेतील 1200 पालकांनी दिनांक - 15/7/2024 रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार तसेच संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे यांना निवेदन दिलेलं होते. परंतु याची आज पर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी दाखल घेतलेली नाही. म्हणून आज दिनांक - 5/7/2024 रोजी शाळेतील 200 ते 250 पालक शिक्षण उपासंचालक कार्यालय येथे धरणे आंदोलनासाठी आले होते. शिक्षण उपसंचालक हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी पालकांना फोनवरून कार्यवाही सुरु करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना केल्यात.सहाय्यक संचालक श्री. लिंबाजी सोनवणे यांना पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व पालकांच्या समोरच त्यांनी कार्यवाही करण्यासंदर्भात पत्र पाठवून त्याची एक प्रत पालकांना देण्यात आली. तसेच सोमवारी चौकशी समिती नेमून संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे.

शाळेने बेकायदेशीर पणे केलेली शाळेची फी वाढ, बस ची फी वाढ, प्रत्येक नवीन ऍडमिशन साठी 25 ते 30 हजार रुपये डोनेशन घेतले जाते, शाळेत मुलांना बसायला वर्ग उपलब्ध नसून ही प्रत्येक पालकांकडून बिल्डिंग फंड घेतला जातो तो दरवर्षी करोडोमध्ये जमा होतो, पालकांना कुठलीही पूर्वकल्पना नं देता ड्रेस बदल करून पालकांना नवीन ड्रेस घेण्यास भाग पाडणे, क्रीडा शिक्षण नं देता पिटी चा गणवेश कम्पलसरी करणे, व संस्थेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच ड्रेस विकत घ्यायची सक्ती करणे, शासन नियमाप्रमाणे शाळेत शालेय साहित्य विकणे हा अपराध असून ही पालकांना शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करणे व पालकांकडून पुस्तकांचे 2000 ते 2200 रुपये वसुल करणे. दर वर्षी मुलांचा कुठलाही विमा पॉलिसी नं काढता प्रत्येक पालकांकडून 200 रुपये आकाराने या सह खुप मोठ्या प्रमाणात शाळेच्या व संस्थेच्या वतीने भ्रस्टाचार सुरु आहे. पालकांना शिक्षण विभागाकडून ही न्याय मिळत नाहीये पालकांना न्याय नं मिळाल्यास पालकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो.मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे यांना पालकांनी आपली व्यथा मंडली परंतु ठाकरे यांनी महिला पालकांचा अपमान केला त्यांना सांगितले की तुम्हाला याची संस्था परवडत नसेल तर तुमची मुलं आमच्या संस्थेतून काढून दुसऱ्या शाळेत जा. या पद्धतीने पालकांचा अपमान करण्यात येतो.अनेक पालकांना संस्थेच्या संचालकांच्या सांगण्यावरून काही अज्ञात व्यक्तींचे धमकीचे फोन पालकांना येतात जर तुम्ही पुन्हा आंदोलन केले तर जीवे मारण्याची ही धमकी पालकांना दिली जात आहे.

पालकांना न्याय मिळावा व पालकांची फी परत मिळावी. तसेच शाळेने व संस्थेने चालवलेले इतर गैरव्यवहार थांबावे ही पालकांची मागणी आहे.

महेश पाटील, पालक
9075042955

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध