Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ जून, २०२५
गोरक्षकांकडून दोन बैलांची सुटका, बेटावदचा आरोपी फरार
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैलांची सुटका केली. एक बैल घेऊन मात्र आरोपी फरार झाला आहे. ही घटना १७ रोजी सकाळी पाच वाजता घडली.
संग्राम शामसिंग परदेशी रा हरेश्वर कॉलनी चोपडा हे गोरक्षक अमळनेरहून बेटावद कडे मोटरसायकलने जात असताना त्यांना झाडी गावाजवळ सकाळी ६ वाजता पिकअप वाहन क्रमांक एम एच ४१ , जि २६६० येताना दिसली. त्यात तीन बैल दाटीवाटीने कोंबलेले दिसून आले. परदेशी यांनी वाहन थांबवून त्याला परवाना विचारला असता परवाना नव्हता त्याने त्याचे नाव मुस्तफा करीम कुरेशी रा बेटावद ता शिंदखेडा असल्याचे सांगितले. हे गुरे त्याने शिंदखेडा येथून आणल्याचे सांगितले. गोरक्षकांनी त्यातील दोन बैलांची सुटका करून झाडी गावात उतरवले. तोपर्यंत मुस्तफा पिकअप वाहन आणि त्यातील एक बैल घेऊन पळून गेला. परदेशी यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून मुस्तफा विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)ड ,फ प्राणी परिवहन नियम कलम ४८,४९,५६ (क) , महाराष्ट्र पोलीस अधिनोयं कलम ११९, ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असूण तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. खापरखेडा...
-
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैल...
-
आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष...
-
बेटावद, ता. शिंदखेडा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय ...
-
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मो...
-
अमळनेर : येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयड...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा