Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ जून, २०२५

जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने सरपंच सखाराम भंडलकर यांचा सन्मान



आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आळे (ता.जुन्नर )या ठिकाणी समाज मंदिर (बाजारतळ )याठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी पारनेर तालुक्याचे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतर यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.तसेच संघटनेचे जुन्नर तालुका संपर्क प्रमुख संदीप शितोळे, आळे गावचे उपसरपंच मंगेश कुऱ्हाडे,ज्ञानेश्वर देवस्थान विश्वस्त आनंद विलास शिरतर, धोंडिभाऊ भंडलकर, विलास भाऊ शिरतर, बबलू भंडलकर, अंबिका माता देवस्थान उपाध्यक्ष किशोर कैलास शिरतर, सुरेश शिरतर, सचिन भंडलकर, आण्णा गडकरी, अरविंद बहिरट, चंदू भंडलकर, सिताराम येलमर, सोनभाऊ भंडलकर,संजय शिंदे, विशाल गुळवे, आकाश भंडलकर, बाळासाहेब शिरतर यादी समाज बांधव उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध