Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ जुलै, २०२५

साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर महायुतीचा सौं.उषा पवार यांची बिनविरोध निवड



साक्री साक्री नगरपंचायतीच्या
नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
साक्री नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सौ.उषा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या.तत्कालीन नगराध्यक्षा सौ.जयश्री पवार यांचा कार्यकाळ संपल्यामुळे राजीनामा दिला होता.
नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता.त्यानुसार दिनांक २५
रोजी अध्यक्ष पदासाठी सौ.उषा पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नगराध्यक्षपदी उषा अनिल पवार यांची निवड झाल्याची घोषणा केली.
याप्रसंगी भाजपाचे गट नेते बापू गीते,पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ, बांधकाम सभापती उज्वला भोसले,नगरसेविका मनिषा देसले,जयश्री पगारिया,नगरसेवक अॅड्, गजेंद्र भोसले,प्रवीण निकुंभे,रेखा सोनवणे,संगीता भावसार,अपक्ष नगसेवक कल्पना खैरनार,कॉग्रेसच्या नगरसेविका नबीसाबी पठाण,
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे,सुमित नागरे, राहुल भोसले,सोनल नागरे,यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
याप्रसंगी भाजपाचे बिनोद पगारिया,आबासाहेब सोनवणे, अनिल पवार,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र देसले,रंगा भवरे,स्वप्नील भावसार,केतन खखैरनार,गोविंदा सोनवणे, गणेश सुर्यवंशी उपस्थित होते.नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी,बांधकाम अभियंता तेजस लाडे,यानी सहकार्य केले.तर जुबेर पठाण,दीपक पाटील,युवराज गीते, साक्री पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी संजय शिरसाठ,शांतीलाल पाटील,उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध