नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी विभागाच्या पथकाने केली कार्यवाही आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मा.सुनील बोरकर सर कृषि संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे,
मा.सुभाष काटकर सर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक,
श्री चेतन कुमार ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार ,श्री किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार व श्री उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
आज दि.31.05.2025रोजी मिळालेल्या गुप्त खबरीनुसार
नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यांतील विखरण येथे प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोगस कापुस बियाणेची पाकीटे जप्त करण्यात आली आहेत.आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास श्री उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुण नियंत्रण नाशिक विभाग नाशिक,श्री.स्वप्नील शेळके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,नंदुरबार,श्री. सचिन देवरे मोहीम अधिकारी,
श्री प्रकाश खरमाळे कृषी अधिकारी,श्री योगेश हिवराळे कृषि अधिकारी, श्री महेश विसपुते कृषि अधिकारी यांच्या पथकाने सकाळी 7 वाजेपासून पाळत ठेवून खाजगी इसम हाटमोहिदे येथील श्री जितेंद्र नरोत्तम पाटील हे प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करत असताना रंगेहाथ पकडले.नंदुरबार तालुका पोलीस ठाणे,येथे श्री.योगेश हिवराळे यांनी श्री.जितेंद्र पाटील व उत्पादक कंपनी यांचे विरोधात नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन मधे बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी श्री चेतन कुमार ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार,श्री किशोर हडपे कृषि विकास अधिकारी नंदुरबार,श्री उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक व श्री कल्याण पाटील कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांनी मार्गदर्शन केले.
प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा मा.सुभाष काटकर सर , विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा