Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

महाकोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन वर्षापासुन फरार आरोपी व इतर आरोपींना अटक! निजामपुर पोलीसांची धडक कारवाई !



निजामपुर पोलीस स्टेशनला आजपावेतो दाखल असलेल्या गुन्हयामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणेकरीता मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. यांचे आदेशांन्वये महाकोंबिंग ऑपरेशन आज दिनांक २५/०७/२०२५ रोजी पहाटे ०३.३० वाजेचे सुमारास रवाना होऊन निजामपुर पोलीस स्टेशन हददीतील जामदा गावी राबविण्यात आले. त्याकरीता. धुळे जिल्हयातुन २० पोलीस अधिकारी, २२० पोलीस अंमलदार सह ०२ आर.सी.पी. पथकांसह हे शासकिय वाहनांचा फौजफाटासह जामदा गावात जाऊन रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपीतांचा शोध घेतला त्यामधे निजापमुर पोलीस स्टेशन गुरन ६३/२०२२ भादवी कलम ३९५,५०४,५०६,३४ मधील मागील दोन वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे पॉलीस्टर कोमलसिंग पवार रा. जामदा ता. साक्री हा मिळुन आला तसेच २) निजामपुर पो. स्टे गुरन १२८/२०२५ भान्यासं-३(५), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड), ८४ (C) प्रमाणे मधील आरोपीताचे कोणतेही नाव निष्पण्ण नसताना सदर गुन्हयाचा उलगाडा करुन त्यातील आरोपी मिराबाई गोलीबाई पवार रा. जामदा ता. साक्री हिस व ३) निजामपुर पो.स्टे गुरन १९१/२०२५ भान्यासं.क.११५ (२), ३०९ (४),३५१ (२) वैगरे मधील आरोपी नामे साहिल सजनदास भोसले रा. जामदा ता. साक्री या तिघे आरोपीतांचा ताब्यात घेऊन अटक करीत आहोत. तसेच जामदा गावी विना नंबर प्लेट व कोणतेही कागदपत्रे व गुन्हयांमधील एकुण-१७ मोटार सायकल व एक फोरर व्हिलर असे एकुण-१८ वाहन ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. मा. अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हयातुन एकुण २० पोलीस अधिकारी, व २२० पोलीस अंमलदारांसह ०२ आर.सी.पी.पथक यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध