Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ जुलै, २०२५

महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या पेण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती..!



सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या पेण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती..!
"सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे"
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे सर, महासचिव विनोद पवार सर, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार सर, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे सर, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ सर, राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड राज्य उपाध्यक्ष विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, राज्य सचिव दत्ता मुजुमले सर, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे सर, अन्याय अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता पाटील व राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अडांगळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, राज्य सचिव प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले व रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या आदेशानुसार पत्रकार कैलासराजे घरत यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या "पेण तालुका अध्यक्ष" या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ प्रणित अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर मॅडम उपस्थित होत्या.पेण तालुक्यातील खारपाडा गावातील एक नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, राज्यस्तरीय व्यसनमुक्तीदुत, सामाजिक कार्यकर्ते, युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन (एनजीओ)संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन्मानित पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि उत्कृष्ठ पत्रकारिता कार्याची दखल घेऊनच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या पेण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 
सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे. सन्मानिय कैलासराजे घरत एक उत्तम निर्भिड पत्रकार असून जनसामान्यांच्या समस्यांना, अन्यायाला आपल्या लेखणीच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अपघात ग्रस्तांना उपचारासाठी मदत, शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करणे असे कोणतेही क्षेत्र बाकी नाही. जिथे कमी तिथे आम्ही. त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. 

त्यांच्यासारख्या एका कार्यकुशल, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाची पुरोगामी पत्रकार संघाच्या पेण तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध राजकीय, विविध सामाजिक संघटना, डी वाय फाउंडेशन, भारतीय दलीत साहित्य अकादमी मुंबई, रायगड स्वाभिमान वृत्तपत्र, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, पत्रकार मित्र, पदाधिकारी, आई एकवीरा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, अष्टगंध कलामंच उरण नवी मुंबई, राजे मित्रपरिवार, दुष्मी, खारपाडा ग्रामस्थ, मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दैनिक रायगड स्वाभिमान, दैनिक आधुनिक केसरी, महाक्रांती न्यूज २४, सारथी न्यूज, साप्ताहिक जन महाराष्ट्र न्यूज, साप्ताहिक वेध विकासाचा, महाराष्ट्र ग्रामीण न्यूज यामध्ये वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्षे काम करीत असताना समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर  होणाऱ्या अन्यायाविरोधात जनजागृती तसेच अनेक मोर्चा उपोषण, धरणे आंदोलन यात सक्रिय सहभाग, अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रिय कार्यरत असून युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन
(एनजीओ) या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजपयोगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, वृक्ष संवर्धन, गडसंवर्धन स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नशामुक्ती, मधुमेह मुक्ती, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक म्हणून अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीसाठी गडकोट संवर्धन माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे गडाचे विविध भाग यांची माहिती देणे, सर्प जनजागृती व्याख्यानमाला, सुंदर सुवाच्च हस्ताक्षर पाठमाळा, शिवशंभूचरित्र इतिहास प्रश्नमंजुषा स्पर्धा, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा मार्गदर्शन शिबिर, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, इयत्ता १०वी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स शिबिर, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संभाषण कौशल्य कार्यशाळा, इंग्लिश स्पीकिंग, थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध