Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

ऐनपूर आरोग्य केंद्रात गरोदरमाता व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

रावेर प्रतिनिधी/ भिमराव कोचुरे

रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि २६ रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबिर अंतर्गत गरोदर माता व किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली.
सविस्तर असे कि तालुक्यातील ऐनपूर प्राथमिक केंद्रात दि. २६ रोजी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शन खाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांच्या सूचनेनुसार “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” शिबिर अंतर्गत गरोदर माता व किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली.
सदर प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन परदेशी व तपासणीसाठी आलेल्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुचिता कुयटे यांनी तपासणी केली. व सोबत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित पाटील, शंतनु पाटिल. संदिप सरकटे. आरोग्य निरीक्षक चिंतामण पाटिल आरोग्य सहाय्यक गटमाने एल एच व्ही चंदनकर सिस्टर,ए एन एम, एम पी डब्लू, सर्व कर्मचारी तसेच गरोदर माता आणि किशोरवयीन मुली उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध