Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

शिरपूरमध्ये गांजाची मोठी खेप जप्त; 10.380 किलो गांजासह कार जप्त, दोघांना अटक



शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील भाटपूरा चौक परिसरात थाळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 10.380 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी ₹5 लाख किमतीची कार व एकूण ₹5.83 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 01.45 वाजता, शिरपूर–चोपडा रोडवरील भाटपूरा चौकाजवळ संशयास्पद पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्रमांक GJ-06-PL-6353) थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवलेला सुका गांजा आढळून आला.अटक करण्यात आलेले आरोपी आकाश मुकुंद पानपाटील (वय 28, रा. मोगलाई, स्मशानभूमी चौक, धुळे) कुणाल सुभाष नाईक (वय 24, रा. दौलतनगर, शिरपूर) जप्त मुद्देमाल
गांजा : 10.380 किलो (अंदाजे किंमत ₹83,080) स्विफ्ट कार : ₹5,00,000
एकूण मुद्देमाल : ₹5,83,080 ही कारवाई थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पथकाने पंच, वजनकाटा धारक व फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत केली. आरोपींकडून गांजा विक्रीसाठी नेत असल्याची कबुली प्राथमिक तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii) व 22(ब) अन्वये गुन्हा क्रमांक 0173/2025 नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध