Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

जिल्ह्यातील -- वरवाडे नगरपरिषद निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष; ‘राजा कोण, गंगू तेली कोण ?’ जनतेत जोरदार चर्चा



शिरपूर प्रतिनिधी–वरवाडे नगरपरिषदेच्या आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रचाराच्या काळात विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या प्रश्नांवर मोठमोठी आश्वासने दिली गेली. मात्र आता मतपेट्यांतील निर्णयातूनच कोण खरा ‘राजा’ ठरणार आणि कोण ‘गंगू तेली’ ठरणार, हे स्पष्ट होणार आहे.

नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रत्येक प्रभागात काट्याची टक्कर असून मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला. निकालाबाबत शहरात सकाळपासूनच उत्सुकता, चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, नागरिकांमध्ये एकच सवाल चर्चेत आहे— काम करणाऱ्यांना सत्ता मिळणार की केवळ आश्वासनांवर राजकारण करणाऱ्यांचा पराभव होणार?
निकालातूनच पुढील पाच वर्षांचा कारभार आणि शहराच्या विकासाची दिशा ठरणार असल्याने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.आता काही वेळातच सर्व स्पष्ट होणार असून, जनतेच्या कौलातून कोण राजा आणि कोण गंगू तेली, हे ठरणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध