Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

सावधान बॅक डेट शिक्षक भरती कराल तर होऊ शकते अटक? वयाची 45 वर्ष पूर्ण लोकांची शिक्षक बनण्याची स्वप्न भंगणार



सिनियर क्लार्क, ज्युनिअर क्लार्क, लॅब अटेंडंट ची पदे प्रमोशन नुसारच यापुढे एकाही माध्यमिक प्राथमिक शाळेत बॅक डे टेट शिक्षक भरती करता येणार नाही आहे.बॅक डेट शिक्षक भरतीच्या प्रस्तावावर पोलिसांची नजर असू शकते.यापुढे ज्या पण शिक्षण संस्थेकडून शिक्षण विभागाकडे बॅक डेट शिक्षक भरतीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याची खबर वरिष्ठ अधिकार्यांना दिली जाणार आहे. त्यानंतर त्यात बोगस कागदपत्रे मागील तारीख टाकून बनावट ठराव करून आणलेले आढळल्यास सरळ सरळ ती फाईल पोलीस विभागाकडे पाठवली जावू शकते. आणि त्या फाईल वर सह्या करणारे संस्थेचे अध्यक्ष सचिव संचालक मुख्याध्यापक यांच्या वर कायदेशीर कारवाई होऊन त्याना अटक पण होऊ शकते.म्हणून आणि "यापुढे एकाही संस्था चालकाने बॅक डेट" शिक्षक भरतीचा प्रयत्न केल्यास ते त्त्यांच्या अंगलट येणार आहे.

त्याचबरोबर वयाची 45 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला शिक्षक पदासाठी अर्ज करता येणार नाही आहे. तसेच कला (Atd), क्रीडा (Bped ), कार्यानुभव (Ctc )* ही पदे देखील भरण्यास परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे. यापुढे संस्थेत कोणतीही शिक्षक भरती करायची असल्यास त्याची जाहिरात पवित्र पोर्टल तसेच स्थानिक पेपरला द्यावीच लागणार आहे.त्याचबरोबर बोगस संच मान्यता, बनावट सूची, बिंदू नामावली टाळून भरती करता येणार नाही. आता वशिल्यात शाळेत रिक्त पदावर शिक्षक भरती होणारच नाही.
त्याचबरोबर शाळेत सिनियर क्लार्क, ज्युनिअर क्लार्क आणि लॅब अटेंडंट च्या जागा रिक्त असतिल तर त्या जागेवर "खालच्या कर्मचाऱ्याला प्रमोशन" नुसार बढती मिळणार आहे. त्यामुळे त्या जागाची भरती करणे पण अवघड होणार आहे.
शिपाई पद पण पट संख्येवर, संच मान्यतावर अवलंबून असल्यामुळे नवीन शिपाई भरती पण रखडणार आहे.

आणि यापुढे जोपण शिक्षण खात्यातील शासकीय कर्मचारी बोगस बॅक डेट शिक्षक भरतीच्या "फाईल स्वीकारेल" त्याच्या वर पहिला गुन्हा दाखल होऊ शकतो.
आणि अगोदर ज्या पण शिक्षकांच्या बॅक डेट बोगस शिक्षक भरतीच्या फाईल जिल्हा शिक्षण विभागाकडे अप्रूव्हल साठी पडून आहेत त्यापण पोलीस चौकशी साठी ताब्यात घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. म्हणून त्या फाईल पाठवणारे शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यक्ष,सचिव, संचालक यांचे चांगलेच धाबे दणा णले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध