Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

नाशिक जिल्ह्यातील २१ वर्षीय कन्या आणि पुणे विद्यापीठाची इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी प्रिती दिपक लांडगे हिची नवी इंग्रजी कादंबरी" व्हेन वाऊंड्स बिकम विंग्स " जागतिक स्तरावर प्रकाशित



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी आणि मूळची नाशिकची असलेली राज्यस्तरीय वक्तृत्वपटू प्रिती लांडगे हिने लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिची पहिली कादंबरी"व्हेन वाऊंड्स बिकम विंग्स " जागतिक स्तरावर "' नुकतीच प्रकाशित झाली असून, वाचकांचा तिला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
भारत सरकारची अधिकृत मान्यता
या पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे याला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत असलेल्या 'राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन' (आर आर आर एल एफ) कडून अधिकृत आय एस बि एन प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारची ही मान्यता पुस्तकाची गुणवत्ता आणि जागतिक कायदेशीर वैधता सिद्ध करते. कादंबरीचा थोडक्यात परिचय म्हणजे ही कादंबरी प्रिशा आणि शान या दोन तरुणांच्या संघर्षाची कथा आहे.यु पि एस सि परीक्षेची तयारी करताना आयुष्यात आलेल्या एका भीषण अपघातामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. हा अपघात शानला अशा स्थितीत नेतो जिथे जगण्याची आशा कमी असते. अशा कठीण काळात, 'निष्ठा' आणि 'संयम' यांच्या जोरावर दुःखातून सुखाकडे कसा प्रवास करता येतो, याचे प्रेरणादायी चित्रण प्रिती लांडगे हिने या पुस्तकात केले आहे.

इंजिनिअरिंग ते लेखन प्रवास हा
नाशिकमध्ये जन्मलेली आणि वाढलेली प्रिती वक्तृत्वातून आणि गायनातून हजारो लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर आता तिने शब्दांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचे ठरवले आहे. प्रिती म्हणते, "इंजिनिअरिंगमध्ये ती इमारतींचा पाया मजबूत करायला शिकले, पण या पुस्तकाच्या माध्यमातून मानवी मनाचा पाया आणि जिद्द किती मजबूत असू शकते, हे मांडण्याचा तिने प्रयत्न केला आहे."

                 चौकट

पुस्तक कोठे उपलब्ध आहे?
• ई-बुक अमेझॉनवर अमेझॉन.इन जगभरात उपलब्ध असुन पेपरबॅक पोथी डॉट कॉम वर देखील छापील स्वरूपात उपलब्ध
हवी असल्यास
 
लेखिका: प्रिती लांडगे यांचा
ईमेल pritilandage21@gmail.com
नाशिक(वणी) यांच्या या इमेल वर ऑनलाईन संपर्क करून मागवू शकता असे आव्हान लेखिका प्रीती लांडगे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध