Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
Home
/
/
निफाड तालुक्यातील विंचुर परिसरात ७०१ ग्रॅम एम.डी.अंमली पदार्थ जप्त; विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक व नाशिक ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई
निफाड तालुक्यातील विंचुर परिसरात ७०१ ग्रॅम एम.डी.अंमली पदार्थ जप्त; विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक व नाशिक ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई
संदीप अवधूत नाशिक ग्रामीण प्रतिनिधी
जिल्हयातील अवैधरित्या अंमली पदार्थाची होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे कारवाई करण्यात येत आहे.
दि. २०/०१/२०२५ रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचुर परिसरात काही संशयीत अवैधरित्या एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विकी करण्याचे उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर प्रकरणी तात्काळ दखल घेवुन, छापा कारवाईकामी उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर, निफाड उपविभाग, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रविंद्र मगर, लासलगाव पो.स्टे. चे सहाय्य्क पोलीस निरिक्षक भास्कर शिंदे यांना तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे पथकातील पोलीस उप निरीक्षक अरूण भिसे आणि नाशिक ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक शैलेश पाटील यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या. त्यानुसार दोन्ही पथकांनी फॉरेन्सिक टीम, पंच, फोटोग्राफर यांचेसह लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचुर शिवारात विंचुर एम. आय.डी.सी. कडे जाणारे रोडवर सापळा रचुन खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले.पैकी १) याकुब खालीद मोमीन, वय ४६, रा.इस्लामपुरा, विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक २) संदेश आंबादास फापाळे, वय ३५, रा. मरळगोई खु॥, ता. निफाड, जि. नाशिक ताब्यात घेतलेला आरोपी क. १. याकुब खालीद मोमीन याचे कब्जातील स्कुटीमध्ये विक्रीसाठी आणलेला ३१५ ग्रॅम ९ मिली वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ छापा कारवाईत जागेवरच ताब्यात घेण्यात आला. त्यास सदर अमली पदार्थाबाबत विचारपुस केली असता, त्याने आरोपी क्र. २. संदेश फापाळे, याचे मार्फतीने सदर एम.डी. पावडर आणल्याची कबुली दिली, तसेच दोन्ही आरोपींना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता, आरोपी क. १ याचे घराचे झडतीमध्ये ३८६ ग्रॅम ४१ मिली वजनाचा एम.डी. पावडरचा साठा मिळून आला. सदर छापा कारवाई यातील आरोपीतांचे कब्जातुन एकूण ७०१ ग्रॅम ०५ मिली वजानाचा कि.रू. ४९,१०,५००/- एम.डी. पावडरचा साठा व टी.व्ही.एस. ज्युपीटर स्कुटी, मोबाईल फोन असा एकूण ५०,१५,५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा एम.डी. पावडर नावाचा अंमली पदार्थ संगनमताने वितरण व विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगतांना मिळुन आले असुन त्यांचेविरुध्द लासलगाव पोलीस ठाणेस गुरनं १४/२०२६ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर नाशिक ग्रामीण चार्ज निफाड विभाग, पोलीस निरीक्षक स्थाानिक गुन्हे शाखा रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे,विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, लासलगाव पो.स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस अंमलदार सुशांत मरकड, प्रमोद मंडलीक, भाउ झाडे, शांताराम जाधव, किशोर पाटील, प्रविण गांगुर्डे, मंगेश गोसावी, विक्रांत मांगडे, स्वप्निल माळी, कल्पना शिंदे, रविंद्र गवळी, शंकर साबळे, संदिप निचळ, ज्ञानेश्वर जाधव, सागर आरोटे, अविनाश सांगळे, औदुंबर मुरडनर, सतिष जगताप यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा