Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

पिंपळगाव छावा संघ ठरला कोराटे करंडकाचा मानकरी



संदीप अवधूत नाशिक जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
   
दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे मकर संक्रांतीचे औचित्य साधून येथील संघर्ष क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
      
या स्पर्धेमध्ये जवळपास ४८ संघांनी भाग घेतला होता.यामध्ये पिंपळगाव छावा विरुद्ध डी बॉईज दिंडोरी यांच्यामध्ये अंतिम लढत झाली यामध्ये पिंपळगाव छावा संघाने डी बॉईज दिंडोरी संघाला हरवून कोराटे करंडकाचा मानकरी ठरला. दिंडोरी बॉईज संघ उपविजेता ठरला तर खेडगाव येथील संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.यावेळी पंच म्हणून विजू ब्राह्मणे व सोमनाथ कदम यांनी काम पाहिले. 
      
संघर्ष क्रिकेट क्लबच्यावतीने सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक म्हणून संदीप कदम गणेश कदम यांच्यातर्फे ५१००१ ह. रुपये दुसरे पारितोषिक म्हणून कै.गेणू शिंदे (सर) यांच्या स्मरणार्थ ग्रेप मास्टर फार्मर प्रोडूसर कंपनी लि.३१००१ ह.रुपये तिसरे पारितोषिक शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या तर्फे २१००१ ह. रुपये चतुर्थ पारितोषिक नामदेव त्र्यंबक कदम यांच्यातर्फे ११००१ ह. रुपये पाचवे पारितोषिक मंगेश कदम यांच्यातर्फे ७००१ ह. रुपये सहावे पारितोषिक सागर कदम ७००१ ह. रुपये यांच्यावतीने देण्यात आले होते. तर मॅन ऑफ द सिरीज योगेश कदम, बेस्ट बॅटमॅन रवींद्र कदम,बेस्ट बॉलर शरद बदादे,ट्रॉफी सौजन्य मधुकर शिंदे,मॅन ऑफ द मॅच प्रशांत देशमुख, यांच्याकडून खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले.तर साऊंड सिस्टिम विनायक मालसाने यांच्यातर्फे देण्यात आली होती.यावेळी पारितोषिक देणाऱ्या मान्यवरांचा व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा संघर्ष क्रिकेट क्लबच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
      
यावेळी पिंपळगाव छावा संघाचे कर्णधार यांनी आपले मनोगत व्यक्त करून कोराटे येथे संघर्ष क्रिकेट क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नियोजनाचे तसेच घेतलेली मेहनत याचे कौतुक करून उपविजेत्या दिंडोरी संघाच्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन पुढच्या वर्षीही आपलं संघ या मैदानावर खेळण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.तसेच नामदेव कदम,नंदू कदम,प्रभाकर शिंदे,यांनी मैदानासाठी आवश्यक असणारी लाल माती देण्याचे आश्वासन दिले.तसेच उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संघर्ष क्रिकेट क्लब चे कौतुक केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील अनेक संघांचे खेळाडू, क्रिकेटप्रेमी,ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध