Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
शिंदखेडा शहरातील भगवा चौकाजवळ भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
शिंदखेडा शहरातील भगवा चौक परिसरात गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात भडणे येथील कु. प्रियंका रावसाहेब कोळी (वय २१) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शिंदखेडा शहरासह भडणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कु.प्रियंका कोळी ही एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. ती दररोज भडणे येथून ये-जा करून महाविद्यालयात जात होती. गरीब शेतकरी कुटुंबातील प्रियंका ही अभ्यासात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती.
गुरुवारी महाविद्यालयातून घरी परतत असताना भगवा चौक परिसरात न्यायालयाच्या बाजूस फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणाऱ्या मालवाहतूक ‘छोटा हत्ती’ वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रियंकाच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला १०८ रुग्णवाहिकेद्वारे धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णवाहिकेत डॉ. सद्दाम खान, चालक चंद्रशेखर चौधरी तसेच भडणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मालवाहतूक वाहनाचा चालक राहुल पाटील (रा. वरुळ) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा