Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६
आमच्या हक्काचं आमच्यापासून हिसकावून घेऊ नका...
पिढ्यान्पिढ्यांचा मच्छीमारी
पोटापाण्याचा धंदा आमचा
असा हिसकावून नेऊ नका
आमच्याच हक्कासाठी
आम्हाला लढायला लावू नका...
आमच्या हक्काचं आमच्यापासून
हिसकावून घेऊ नका
आमच्या लेकराबाळांच्या तोंडातला घास
असा ओढून घेऊ नका...
उपाशी मरतील आमच्या पिढ्या
मुडदे शासनदरबारी आणायला लावू नका
मच्छीमार हीच आमची खरी ओळख
आमच्यापासून हिरावून नेऊ नका...
आमच्या हक्काचं आमच्यापासून
हिसकावून घेऊ नका
आमच्या लेकराबाळांच्या तोंडातला घास
असा ओढून घेऊ नका...
भरू द्या पोट आम्हाला
जलक्रांती करायला लावू नका
निरपराध समाज आमचा
अपराध्यांच्या पिंजऱ्यात अडकवू नका...
आमच्या हक्काचं आमच्यापासून
हिसकावून घेऊ नका
आमच्या लेकराबाळांच्या तोंडातला घास
असा ओढून घेऊ नका...
— लक्ष्मण वाल्डे - कन्नड
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा