Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६
शिव शिव बाबा मंदिरात व टिळेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवात साजरी
संदीप अवधुत
महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला (फेब्रुवारी-मार्च) साजरा केला जाणारा भगवान शिवाचा सर्वोच्च सण आहे हा दिवस शिव-पार्वती विवाह, शिवाने तांडव नृत्य केलेला दिवस आणि अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जातो. या दिवशी उपासक उपवास, रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर दूध, बेलपत्र अर्पण करून पूजा करतात, ज्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात व आत्मशुद्धी होतte हा सण आध्यात्मिक जागृतीचा आणि शिवाच्या कृपेचा दिवस आहे. या दिवशी भगवान शिव निराकार रूपातून साकार रूपात अवतरले होते, अशी मान्यता आहे
पौराणिक कथा नुसार माता पार्वतीने महादेवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती आणि या रात्री त्यांचा विवाह झाला,
शिवलिंगावर जल, दूध, दही, तूप, मध आणि साखर (पंचामृत) अर्पण करून
बेलपत्र, धतुरा, भांग आणि पांढरी फुले गुलाब अर्पण करून पूजा विधी करण्यात आला तसेच रात्रीचे जागरण करत महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरांत पूजा केली गेली तीअत्यंत फलदायी मानली जाते
महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे
ही रात्र मानवी शरीरातील ऊर्जा एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी उपयुक्त मानली जाते. अंधार आणि अज्ञानाचा नाश करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा दिवस आहे, याचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे टिळेश्वर महादेव मंदिरात पंचमुखी मुखवट्याची वनी परिसरात वाजत गाजत भव्य मिरवणूक. काढण्यात आली तसेच तिलेश्वर भक्त परिवाराच्या वतीने जगदंबा माता मंदिरात जगदंबा मातेला पंच मुखी मुखवटा भेटून जगदंबा मातेला साडी अर्पण करून महाआरती करण्यात आली तसेच पंचमुखी मुखवट्याची संपूर्ण वनी परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली असून टिळेश्वर मंदिरात व अगस्तेश्वर महादेव मंदिर शिव शिव बाबा मठ विधियुक्त पूजा पाठ करून होम हवन करण्यात आले तसेच तसेच महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम करण्यात आला यावेळी टिळेश्वर महादेव भक्त परिवार शिव शिव बाबा भक्त परिवार तसेच सर्व वणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ हे उपस्थित होते सदरील महाशिवरात्रीचा कार्यक्रम हा अत्यंत उत्साहात पार पडला
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा