Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

नाशिक ग्रामीण पोलिसांचा छ. संभाजीनगर येथील बनावट चलनी नोटांच्या प्रेसवर छापा



माधव खाबिया - दिंडोरी

दिनांक २३/०१/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास एचडीएफसी बँक, टाणा नाका, मालेगाव येथे इसम नामे गणेश कैलास खरे (कलेक्शन एजंट, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स) यांनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीच्या खात्यात जमा करण्यासाठी आणलेली एकूण ₹८९,०००/- रक्कम जमा करताना त्यापैकी ₹५०,०००/- रकमेच्या ₹५०० दराच्या १०० नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले याबाबत फिर्यादी मोहन पुराव मुसळे, असिस्टंट मॅनेजर, एचडीएफसी बँक, शाखा सटाणा रोड, मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. २३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८० प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपासादरम्यान गणेश खरे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांना मिळालेली ₹८९,०००/- रक्कम ही इसम अजय राठोड रा. जातेगाव ता. नांदगाव याने रायबान मोरे यांच्या ट्रॅक्टरच्या सहामाही हप्त्याकरिता दिल्याचे निष्पन्न झाले.
अजय राठोड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर रक्कम त्यास करण राठोड रा. जातेगाव ता. नांदगाव याने दिल्याचे समजले. करण राठोड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यास बनावट नोटा बन्सीलाल यादव रा. कन्नड यांनी पुरवल्याचे निष्पन्न झाले. बन्सीलाल यादव यांनी एकूण ₹१,१३,०००/- किंमतीच्या ₹५०० दराच्या बनावट नोटा करण राठोड यास दिल्या होत्या. त्यापैकी ₹५०,०००/- रक्कम करण राठोड यांनी अजय राठोड मार्फत ट्रॅक्टर हप्ता भरण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सच्या कलेक्शन एजंटकडे दिली होती.
प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने बन्सीलाल यादव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यास बनावट नोटा रेहान खान (रा. कन्नड) याचा मित्र समीर शेख (रा. कन्नड) यांनी पुरवल्याचे निष्पन्न झाले.
पुढील तपासात समीर शेख यास बनावट नोटा गोल्डन कुरेशी (रा. संभाजीनगर) यांनी पुरवल्याचे समजले. गोल्डन कुरेशी यास बनावट नोटा अजिंक्य जाधव यांनी पुरवल्या होत्या, तसेच अजिंक्य जाधव यास बनावट नोटा शुभम थोरात (रा. संभाजीनगर) यांनी पुरवल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी पुढील चौकशीदरम्यान नमूद गुन्ह्यातील बनावट नोटा तयार करणारा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर, व्यवसाय – ग्राफिक डिझायनर, रा. जय भवानी नगर, छत्रपती संभाजीनगर यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ₹५०० दराच्या एकूण २०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच त्याच्या “विनायक ग्राफिक्स” नावाच्या दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी एकूण ₹१,३६,७००/- किंमतीची साधनसामग्री जप्त करण्यात आली असून त्यामध्ये संगणक, प्रिंटर, ८५ GSM पेपर, स्क्रीन प्रिंट साहित्य, पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन, गिंट इंक, स्केल, कटर इत्यादी साहित्याचा समावेश आहे.

पोलीसांनी तपासादरम्यान एकूण ₹५०० दराच्या ३८५ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.सदर गुन्ह्याचा तपास बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण व तेजबीर सिंह संधू,अपर पोलीस
अधीक्षक, मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन दुगड भापोसे, सहा. पोलीस अधीक्षक, कॅम्प उपविभाग हे करीत असून पोलीसांनी बनावट चलनी नोटा तयार करणारे बाहेर जिल्ह्यातील रॅकेट उघडकीस आणले आहे.

दर्शन दुगड भापोसे, सहा. पोलीस अधीक्षक, कॅम्प उपविभाग,सपोनि योगेश पाटील,पो. हवा. १९७३ गांगुर्डे,पोशि ६७२ सैय्यद, पोशि ४८७ नितीन अहिरे, पोशि २९६ वैभव आहेर,पोशि २७२ सलमान खाटीक, पोशि २८५१ गोरख ठोंबरे, सर्व नेमणूक – छावणी पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण इत्यादीचा तपास पथकात सहभाग आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध