Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६
दिंडोरी येथे एसटी स्मार्ट कार्डाचा शुभारंभ
तरुण गर्जना प्रतिनिधी बापू चव्हाण दिंडोरी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या प्रवास व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल होत आहे आता प्रवाशांना तिकिटा ऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरता येणार आहे.रोख व्यवहार कमी करून प्रवास अधिक सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ही योजना लागू केली आहे.या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथे एसटी प्रवास स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे.या योजनेचा एसटी प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी येथील पांडुरंग डिजिटल सेवा केंद्राचे संचालक पवन कस्तुरे संचालिका आरती कस्तुरे यांनी केले आहे.
एसटी महामंडळाने पारंपरिक तिकीट पद्धतीला पर्याय देत एएनसी एएमसी प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे या कार्डद्वारे प्रवाशांना सवलतीची अचूक नोंद रोखिर हित व्यवहार आणि प्रतिपूर्तीची स्पष्ट प्रक्रिया एकाच माध्यमातून मिळणार आहे विविध सामाजिक सवलती घेण्यासाठी भविष्यात हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे या स्मार्ट कार्डाचा लाभ विविध प्रवासी घटना घ देण्यात येणार आहे शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रमांकाची जोडलेले कार्ड मिळणार आहे ज्येष्ठ नागरिक महिला प्रवासी आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार संलग्न कार्ड दिले जाणार आहे दिवंगत प्रवाशांसाठी युडी आयडी क्रमांक जोडून सुविधा असलेले कार्ड उपलब्ध होणार आहे त्यानुसार दिंडोरी आग्रा मध्ये कार्ड नोंदणी मोहीम सुरू झाली आहे.दिंडोरी येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे तरी महिला जेष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग शारीरिक अपंग विद्यार्थी इतर सर्व सवलती सवलत नसलेले प्रवाशांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी येथील पांडुरंग डिजिटल सेवा केंद्राचे संचालक पवन कस्तुरे संचालिका आरती कस्तुरे यांनी केले आहे.
या प्रसंगी वाहतूक नियंत्रण ललित सूर्यवंशी,भास्कर वडजे, बाबुराव अपसुंदे,चिंतामण भालेराव, दशरथ आधाटे,यादवराव ढाकणे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा