Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६
चिंचखेडच्या विविध विकास-कामासंदर्भात मंत्री झिरवळ यांना निवेदन
बापू चव्हाण दिंडोरी प्रतिनिधी -
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील विविध विकास कामांसंदर्भात चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनातर्फे दिंडोरी तालुक्याचे आमदार तथा राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुंबई येथील सुरुची निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की चिंचखेड येथे रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे तालुक्याच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी दुसऱ्या मुख्य बाजारपेठेत जाऊन बस मिळते. येथील दळणवळण हे सोयीस्कर नसल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल वेळेत न पोहचल्याने शेतमालाला भाव मिळत नाही.त्यामुळे येथील रस्त्यांना प्रामुख्याने अर्थसंकल्प बजेटमध्ये समाविष्ट करून निधी मंजूर करावा अशी मागणी चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनामार्फत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवानंद संधान यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे.
चिंचखेड गावापासून इजिमा ९२ क्रमांकाचा रस्ता ग्रा.मा ३१७ पर्यंत चिंचखेड खंडेराव मंदिर ते बोअर ओहळ (पिंपळगाव बसवंत) पर्यंत ६०० मिटर रस्ता कॉक्रिटीकरण करणे,
इजिमा ९२ पासून बोअर ओहळ ते पिंपळगाव बसवंत ग्रा.मा ३१७ दिंडोरी तालुका सीमा हद्दी पर्यंत २४०० मिटर रस्ता कॉक्रिटीकरण/ डांबरीकरण करण्यात यावे तसेच चिंचखेड उंबरखेड इजिमा ९२ क्रमांकाच्या रस्त्यावर पुल उभारणे चिंचखेड उंबरखेड इजिमा ९२ क्रमांकाचा उर्वरित १ किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण,ग्रा.मा.३१७ पासून चिंचखेड जऊळके वणी इजिमा ९२ रस्ता राज्य मार्ग २९ पर्यंत ३ किलोमीटर रस्ता कॉक्रिटीकरण किंवा डांबरीकरण, मारुती मंदिर परिसरात सांस्कृतिक सामाजिक सभागृह आणि पर्यटन विकास योजने अंतर्गत ९९ लाखाचे भक्त निवास करण्यात यावा,ग्राम स्वच्छतेसाठी घंटा गाडी
ग्रामपंचायत चिंचखेड साठी आपल्या निधीतून वैकुंठ रथ मिळावा इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.यावेळी निवेदनातील विकास कामासंदर्भात मंत्री नरहरी झिरवळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी चिंचखेड सहकारी सोसायटीचे चेअरमन शिवानंद संधान आणि पत्रकार तुषार झेंडफळे उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा