Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६
नंदुरबार पोलिसांची धाडसी कारवाई; सुझलॉन टॉवरची केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड
नंदुरबार प्रतिनिधी : सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधून महागड्या कॉपर केबलची चोरी करणाऱ्या दोंडाईचा येथील टोळीचा नंदुरबार तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ८ लाख १५ हजार ३२३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या डोळ्यावर मिरची स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्यांना बेड्या ठोकल्या.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांना १६ फेब्रुवारी रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, शनिमांडळ ते काळमदेव मंदिर रस्त्यावर काही इसम चोरीच्या केबलची खरेदी-विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी काळमदेव फाट्याजवळ सापळा रचला. रात्रीच्या सुमारास दोंडाईचा बाजूकडून आलेले एक मालवाहू वाहन पोलिसांनी अडवले. त्यात चालक शकील लतिफ खाटीक आणि युनूस शहा हमीद शहा (दोन्ही रा. दोंडाईचा) हे मिळून आले. वाहनाची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणावर कॉपर केबल आणि वजनकाटा आढळून आला.
या संशयितांच्या पाठोपाठ टाटा कंपनीच्या दुसऱ्या चारचाकी वाहनाने मुख्य सूत्रधार मेहबूब लुकमान पिंजारी हा येत होता. पोलिसांनी त्याचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांच्या चेहऱ्यावर व डोळ्यांवर मिरची स्प्रे मारला. या हल्ल्यानंतरही पोलीस पथकाने जिद्दीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ४६७ किलो कॉपर केबल, दोन चारचाकी वाहने, तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा