Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६
श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर आरावे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव....
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील व आरावे शिवरातील बुराई व गांधारी नदीच्या संगमावर वसलेले अतिशय प्राचीन असे महादेव मंदिर आहे हे मंदिर किती वर्ष जुने आहे ते निश्चित सांगता येत नाही मात्र पंचक्रोशीतील शिवभक्तांचे ते श्रद्धास्थान असून गांगेश्वर महादेव नवसाला पावतो अशी ख्याती आहे .या ठिकाणी दोन मंदिरे प्राचीन पद्धतीने बांधलेली आहेत. या मंदिराचा इतिहास पहिला असता.या मंदिराचा परिसर २० एकारच्या आसपास आहे.या ठिकाणी पूर्वी गांगेश्वर महाराजांचे वास्तव्य होते.व यापूर्वी परिसरात डोंगर होते.या जमिनीचे २०० ते ३०० वर्षाचे उतारे काढले तर केवळ गांगेश्वर मंदिराचेच नावे आहे.मंदिराच्या एका बाजूला नाला आहे. तर दुसऱ्या बाजूला गांधारी नदी आहे जी गोपनीय अवस्थेत आहे.
त्या मागे जाऊन पहिले असता नदीचे स्वरूप दिसून येत नाही..तीच नदी पुढे जाऊन बुराई नदीला मिळते .मात्र जी गांधारी नदी आहे तिच्या मुखातून पाण्याची धार आजही अविरत सुरु असते .कितीही मोठा दुष्काळ पडला तरी पाण्याची धार किंवा स्रोत मंदिर परिसरात अखंडित पणे सुरु राहतो.परिसरातील दुरदूरचे भाविक भक्त श्रावण मासात व महाशिवरात्रीला महादेवाला नवस फेडण्यासाठी येत असतात.आज महाशिवरात्री निमित्त गांगेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली व भाविक महादेवाचे रांगेने दर्शन घेत होते.तसेच विविध प्रकारचे खेळण्याची दुकानें, पेढे, हॉटेल, नारळ व पूजेचे साहित्य ची दुकानें, या मुळे परिसर गजबजून गेला होता.तसेच शिवभक्तांसाठी प्रसाद म्हणून फराळाचे , व थंड पाण्याचे वाटप करण्यात येत होते.मंदिर परिसरातील नियोजन व सेवा आरावे येथील ग्रा. पंचायतीकडू करण्यात आले होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...
-
बापूसाहेब वाडीले, पारोळा व्हाटसअप नं. 9503559333 पारोळा प्रतिनिधी : पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तालुक्यातील पिंपरी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा