Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६
दोन घरफोड्यांना अटक करण्यात पारोळा पोलीसांना यश
बापूसाहेब वाडीले, पारोळा
व्हाटसअप नं. 9503559333
पारोळा प्रतिनिधी : पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तालुक्यातील पिंपरी येथे नागपूर शहरातील दोन घरफोडी करणारे लपलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांचे कडून मिळाली, की कळमेश्वर पोलीस ठाणे नागपूर ग्रामीण हद्दीत सराईत गुन्हेगार घर फोडी करून तो त्याचा साथीदार असे, पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येवून लपले असुन त्यांचा शोध बाबत माहिती मिळाल्याने सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते, यांनी सदर घटनेबाबत त्यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पारोळा पोलीस ठाण्याचे पो.हे.काॅ. सुनिल हाटकर, आकाश माळी,पो.काॅ. सविता पाटील, होमगार्ड भैय्यासाहेब पाटील, चेतन पाटील यांना माहिती देवून आरोपींचा शोध घेणे कामी पिंप्री या गावी रवाना केले. सदरील नमुद पथक यांनी संशयित यांचा शोध घेतला असता, आकाश यशवंत गराडे रा. धरम नगर कनान जि. नागपूर व अंजू विनोद चांदुरकर रा.अशोक नगर कनान जि. नागपूर यांना साफळा रचत पकडून पारोळा पोलीस ठाण्यात आणुन सदर घटनेबाबत स्थानिक गुन्हा शाखा नागपूर ग्रामीण यांना अवगत करून त्यांचेकडील पथक हे, पारोळा पोलीस ठाण्यात येवून माहिती देत आरोपींना त्यांच्या स्वाधीन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...
-
बापूसाहेब वाडीले, पारोळा व्हाटसअप नं. 9503559333 पारोळा प्रतिनिधी : पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तालुक्यातील पिंपरी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा