Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
महसूल विभागातील १५ सेवा एकाच दिवशी समाधान शिबिरात नागरिकांना उपलब्ध होणार. प्रांताधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे.
महसूल विभागातील १५ सेवा एकाच दिवशी समाधान शिबिरात नागरिकांना उपलब्ध होणार. प्रांताधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे.
तरुण गर्जना माधव खाबिया - दिंडोरी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शासन निर्णया नुसार दिंडोरी उपविभागात माहे मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एकची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने दिंडोरी उपविभागातील पेठ व दिंडोरी तालुक्यातील सर्व मंडळ स्तरावर व नगरपालिका स्तरावर सदर अभियान राबविण्यात येणार आहे.
सदर अभियानात महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी नियोजित करण्यात येणार आहे.सदर अभियानात प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा दुरुस्त करणे,डिजिटल सातबारा व ८ अ चे वितरण करणे, उत्पन्न प्रमाणपत्र व रहिवास प्रमाणपत्र वितरण करणे,जातीचे व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र वितरित करणे , अकृषिक तरतुदी संदर्भातील सुधारणा बाबत जनतेला मार्गदर्शन करणे, संपुष्टात आणलेल्या सनद प्रणाली बाबत मार्गदर्शन व सुधारणा बाबत जनजागृती करणे,भूसंपादन केलेल्या व अकृषीक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दत्तर अद्यावत करणे, इमोजणी,ऍग्री स्टॅक व पी एम किसान योजनेबाबत खातेदारांना मार्गदर्शन करणे,विद्यार्थ्यांना शाळेमध्ये विविध प्रकारचे दाखले वितरित करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे लाभाचे प्रमाणपत्र वितरित करणे,तुकडे बंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे प्रकरणांचा निपटारा करणे,मंडळ स्तरावर पाणंद रस्ते प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करून देणे, सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप करणे इत्यादी १५ सेवा बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मंडळ स्तरावर सर्व विभागांचा समन्वय साधण्यासाठी तहसीलदार यांनी विविध विभागांचा आढावा घेऊन,विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करून,महिला बचत गट व अशासकीय संस्था यांचे शिबिरासाठी सहकार्य घेऊन,मंडळ स्तरावर सोशल मीडियाचा वापर तसेच प्रिंट मीडियाचा वापर करून समाधान शिबिराची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्याबाबत नियोजन केलेले आहे.
दिंडोरी व पेठ तालुक्यातील सर्व नागरिक,महिला शेतकरी खातेदार यांनी सदर अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवून महसूल विभागाशी संबंधित आपले प्रलंबित प्रश्न सोडून
घेण्याचे आवाहन उपविभागीय
अधिकारी दिंडोरी यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा