Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६
Home
/
/
उद्या दि १ मार्च रोजी ऑनलाइन सामान्य ज्ञानस्पर्धा,ज्ञानसमृद्धी अभ्यासमाला उपक्रमाची अंतिम चाचणी संपन्न होणार.
उद्या दि १ मार्च रोजी ऑनलाइन सामान्य ज्ञानस्पर्धा,ज्ञानसमृद्धी अभ्यासमाला उपक्रमाची अंतिम चाचणी संपन्न होणार.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंती निमित्त ज्ञानसमृद्धी अभ्यासमाला सामान्य ज्ञान ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या उपक्रमाची तिसरी व अंतिम चाचणी उद्या एक मार्च रोजी दिंडोरी तालुक्यातील लखमापुर फाटा येथील योगराज लॉन्स येथे होणार असल्याची माहिती आयोजक सचिन वडजे, स्पर्धा समन्वयक नौशाद अब्बास यांनी दिली .
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांचे शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीण जाधव हे राहणार आहेत.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण,अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव,दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ,माजी सैनिक संघटनेचे दिंडोरी अध्यक्ष भारत खांदवे, व्हॉइस ऑफ मीडिया चे जिल्हाध्यक्ष बापू (तात्या) चव्हाण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार,गावरान कट्टा दैनिकाचे संपादक संदीप गुंजाळ,शिष्यवृत्ती व स्पर्धा मार्गदर्शन करणाऱ्या आदर्श शिक्षिका साधना पेलमहाले डी एस डिजीटल स्कुल युट्यूब चॅनलचे संचालक ज्ञानेश्वर संधान आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी सोमनाथ दिघे , अनिल दिघे,माधवराव निगळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांचे वतीने विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह वितरित करण्यात येणार आहे.यावेळी जनता इंग्लिश दिंडोरी या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती साधना पेलमहाले-संधान यांचे शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न होणार आहे.
तरी दिंडोरी तालुक्यातील इयत्ता चौथी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलसह पालकांसमवेत उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धेचे मुख्य आयोजक व दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन वडजे व स्पर्धेचे समन्वयक एम नौशाद अब्बास यांनी केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा