Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२६
Home
/
/
परजिल्ह्यातील महिला वनधिकाऱ्याचा शिरपुरात पतीसह धुमाकूळ; लाकूड वाहतूकदाराकडून 'फोन पे'द्वारे उकळली लाच
परजिल्ह्यातील महिला वनधिकाऱ्याचा शिरपुरात पतीसह धुमाकूळ; लाकूड वाहतूकदाराकडून 'फोन पे'द्वारे उकळली लाच
शिरपूर प्रतिनिधी : शासकीय पदाचा गैरवापर करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढले असतानाच, आता परजिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका महिला वनधिकाऱ्याने शिरपूर परिसरात आपल्या पतीसह अवैध वसुलीचा उच्छाद मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरगुती वापराच्या लाकडाची रीतसर पावती असतानाही, वनविभागाचा धाक दाखवून या महिला अधिकाऱ्याने संबंधित गृहस्थाकडून स्वतःच्या हाताने 'फोन पे'द्वारे लाचेची रक्कम स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका गृहस्थाने आपल्या घरातील जुन्या लाकडाची रीतसर परवानगी व पावती काढून ती लाकडे शिरपूरकडे स्थलांतरित करण्यासाठी वाहनात भरली होती. सर्व कागदपत्रे कायदेशीर असतानाही, रात्रीच्या सुमारास या महिला वनधिकाऱ्याने आपल्या पतीसह सदर वाहन अडवले. संबंधित व्यक्तीने सर्व कायदेशीर पावत्या दाखवूनही या महिला अधिकाऱ्याने आणि तिच्या पतीने कारवाईची भीती दाखवत पैशांची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, कारवाई टाळण्यासाठी या महिला अधिकाऱ्याने चक्क स्वतःच्या हाताने संबंधित गृहस्थाच्या मोबाईलवरून आपल्या नजीकच्या व्यकितीच्या खात्यावर 'फोन पे'द्वारे लाचेची रक्कम वळवून घेतली.
परजिल्ह्यात नियुक्तीवर असताना आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर येऊन, रात्रीच्या वेळी पतीला सोबत घेऊन अशा प्रकारे अवैध वसुली करणे, हा गंभीर गुन्हा मानला जात आहे.
वनविभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, वरिष्ठांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. डिजिटल पुराव्यांसह समोर आलेल्या या प्रकारामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा